Rupali Ganguly Joins BJP : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका अनुमपमा (Anupama) मधील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुलीने (Rupali Ganguly) भाजपात प्रवेश केला आहे. दिल्लीत झालेल्या एका पत्रका परिषदेत रुपाली गांगुलीने आपण भाजपात प्रवेश करत असल्याची माहिती दिली. रुपाली गांगुली आधीपासूनच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समर्थक आहे. देशाच्या विकासाठी भाजप चांगलं काम करत आहे, यामुळेच आपण भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं रुपाली गांगुलीने सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकासाचा महायज्ञ
भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेत माहिती देताना रुपाली गांगुलीने देशाचे नागरीक म्हणून भाजपला समर्थन करायला हवं असं आवाहन रुपाली गांगुलीने केलं. महाकाल आणि माता राणीच्या आशिर्वादामुळे कलेच्या माध्यमातून मी अनेक लोकांना भेटत असते, आणि जेव्हा मी विकासाचा महायज्ञ पाहाते तेव्हा असं वाटतं मी ही यात सहभागी व्हावं, अशी प्रतिक्रिया रुपाली गांगुलीने दिलीय.


भाजप नेते विनोद तावडे यांचं मार्गदर्शन आणि अमित बिनोनी यांचा आशिर्वाद आपल्याला मिळाल्याचंही तीने सांगितलं. पीएम मोदी यांनी देशाला दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर आपण चालू आणि देशाची सेवा करु असंही रुपाली गांगुलीने सांगितलं. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाईन आणि एक दिवस त्यांना माझा अभिमान वाटेल अशी कामगिरी करेन. मला तुमच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची गरज आहे, मी जे काही काम करेन ते चांगलं आणि योग्य करेन. माझे काही चुकले तर तुम्ही मार्गदर्शन करा, असं रुपाली गांगुलीने म्हटलंय.


रुपाली गांगुलीचा 5 एप्रिलला वाढदिवस असतो. पण मंगळवारी रात्री रुपालीने मुंबईत वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. यात टेलिव्हिजन जगतातील अनेक स्टार्स आणि अनुपमा मालिकेतील कलाकार सहभागी झाले होते. या पार्टीचे व्हिडिओज आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्टीनंतर रुपाली गांगुलीने आज सकाळी इन्स्टा स्टोरीवर एक छोटा व्हिडिओ देखील शेअर केला होता. त्यानंतर दुपारी रुपाली गांगुली दिल्लीत दाखल झाली. तिथे विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत भाजपात प्रवेश करत असल्याची तीने माहिती दिली.


कोण आहे रुपाली गांगुली?
रुपाली गांगुलीची अनुपमा ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत रुपाली गांगुली लीड रोलमध्ये आहे. इन्स्टाग्रामवर रुपालीचे 20 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.