नवी दिल्ली : नोबेल विजेते आणि जगभरात सुप्रसिद्ध असलेले अर्थशास्त्रज्ञ जोसेफ स्टिगलिट्ज यांनी भारताला भेडसवू शकणाऱ्या भविष्यातील प्रश्नांबाबत भाष्य केले आहे. भारताला भविष्यात पर्यावरण, नोकरी आणि अर्थशास्त्रासंबंधी आव्हानांचा सामना करवा लागेल. भारत हा दिवसेंदिवस अधिकच प्रगती करेन. पण, या विकासासोबतच भारताला शहरी क्षेत्रातील विकास, नोकरी आणि त्याचे अर्थशास्त्र याबाबत नेहमीच काम करावे लागेल. तेही सावधपणे. भारतात केली जाणारी पारंपरीक पद्धतीची शेती पर्यावरणाला मारक ठरत असल्याचे मतही, जोसेफ स्टिगलिट्ज यांनी व्यक्त केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टिगलिट्ज यांनी पुढे म्हटले आहे की, भारत हा जगाच्या त्या भागात आहे ज्यात पर्यावरणाच्या बदलामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. भविष्यात भारतीय अर्थकारणात पर्यावरण हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या 'इंडिया इकॉनमिक कॉन्क्लेव, 2018' कार्यक्रमात स्टिगलिट्ज बोलत होते.


अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पकडून वाढविण्यात आलेल्या स्टील आणि अॅल्युमिनियमच्या करवाढीच्या धोरणावर स्टिगलिट्ज यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, अशी धोरणे जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्येत वाढच करतात. ट्रम्प यांच्या या धोरणामुळे अमेरिकेत कारविक्रीच्या क्षेत्रात मंदी येईल. याशिवाय इतरही अनेक क्षेत्रांना फटका बसेल.