EPFO Pension Rule: कर्मचारी भविष्य निर्वाहन निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने त्यांच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ईपीएफओकडून कर्मचारी पेन्शनसंदर्भात मोठी अपडेट देण्यात आली आहे. सर्व EPFO ​​खातेधारकांना सरकारकडून दरमहा 7500 रुपये दिले जाणार आहेत. सरकारने केलेली ही घोषणा खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी वरदानच ठरणार आहे. मात्र ईपीएफओने दिलेली ही रक्कम ठराविक कालावधीपर्यंत काम केलेल्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून आणि मालकाच्या खात्यातून काही रक्कम कापली जाते. कर्मचारी ही रक्कम त्याच्या EPFO ​​खात्यातून त्याला पाहिजे तेव्हा काढू शकतो. EPFO ची सुरुवात 1995 मध्ये झाली होती. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ते खुले करण्यात आले.


कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार 7500 रुपये?


कर्मचाऱ्यांच्या खात्यात EPFO ​​कडून दरमहा 7500 रुपये जमा करण्यात येणार आहेत. पण हे कर्मचारी कोण असणार? याबद्दल जाणून घेऊया. ज्या कर्मचाऱ्यांनी किमान 23 वर्षे सेवा दिली असेल, त्यांनाच यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे या नियमात 23 वर्षांची सेवा बंधनकारक आहे. ईपीएफओकडून दिली जाणारी ही रक्कम स्वतंत्रपणे दिली जाणार नाही. तर कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यातच जमा केली जाणार आहे. आगामी काळात कोणताही कर्मचारी केवळ एटीएममधूनच ईपीएफचे पैसे काढू शकणार आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात पेन्शन रक्कम म्हणून जमा केली जाईल, याची नोंद घ्या.


पूर्ण रक्कम काढता येईल


ज्या कर्मचाऱ्यांनी किमान 10 वर्षे नोकरी केली असेल किंवा त्यांच्या वयाची 58 वर्षे पूर्ण झाली असतील तर अशा कर्मचाऱ्यांना पेन्शन काढता येते. आतापर्यंत ईपीएफओचे पैसे काही नियमांनुसारच काढले जाऊ शकतात. पण हे नियमही बदलले जात आहेत आणि लवकरच लोकांना हवे तितके पैसे सहज काढता येणार आहेत. सध्याच्या नियमानुसार एक कर्मचारी त्याची संपूर्ण पीएफ रक्कम दोन कारणांसाठी काढू शकतो. याचे एक कारण म्हणजे घर बांधणे आणि दुसरे कारण म्हणजे लग्न. कर्मचाऱ्यांना आपल्या ईपीएफओ खात्यातून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून रक्कम काढता येते.


पीएफमधून थोडी रक्कम काढण्याची प्रक्रिया


तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करुन घ्या. सर्वप्रथम UAN पोर्टलवर जा. तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाका. आधारशी लिंक केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओटीपी येईल. यानंतर ओटीपी आणि कॅप्चा टाका. तुमचे प्रोफाइल पेज उघडेल. वेबपेजच्या वरच्या उजव्या बाजूला तुम्हाला "ऑनलाइन सेवा" हा पर्याय दिसेल. आता स्क्रोल डाउन ऑप्शन्समधून 'क्लेम' वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ईपीएफओशी लिंक केलेले बँक खाते, क्रमांक टाकून मेंबरशिप तपशीलांची पडताळणी करा.आता दावा केलेली रक्कम EPFO ​​द्वारे या बँक खात्यात जमा केली जाईल असे सांगणारे एक प्रमाणपत्र येईल. आता नियम आणि अटींवर 'होय' वर क्लिक करा.आता तुम्ही ऑनलाइन दाव्यासाठी पुढे जा. तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच, एक विभाग उघडेल ज्यामध्ये तुम्हाला अधिक तपशील भरावे लागतील. आता तुमचा पत्ता द्यावा भरा आणि स्कॅन केलेला चेक आणि फॉर्म 15G सारखे काही दस्तऐवज अपलोड करा. आता ईपीएफ खात्यातील शिल्लक काढण्यासाठी दावा सादर केला जाऊ शकतो.


पीएफ खात्यातील शिल्लक कशी जाणून घ्यायची?


आपल्या पीएफ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, याची माहिती आपल्याला असायला हवी. कारण गरजेच्या वेळेला ही रक्कम तुम्हाला उपयोगी येईल. तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. यासाठी 7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. यानंतर तुम्ही तुमच्या EPF खात्यातील शिल्लक आणि तुमच्या खात्यातील अपडेटेड कॉन्ट्रीब्युशन देखील जाणून घेऊ शकता. तुम्हाला नोंदणीकृत क्रमांकावरून AN EPFOHO ENG टाइप करून मेसेज पाठवावा लागेल. इथे ENG चा संदर्भ इंग्रजी आहे. तुम्हाला दुसऱ्या भाषेत जाणून घ्यायचे असल्यास त्या भाषेतील पहिली तीन अक्षरे टाईप करा.