नवी दिल्ली : प्रोविडंट फंडच्या खातेधारकांसाठी मोठी बातमी आहे. EPFO नेआपल्या खातेधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 1 जून पासून तुमच्या PF खात्याबाबत नवीन नियम लागू असणार आहे. खातेधारकाने आपले खाते आधार वेरिफाइड करायला हवे. असं न केल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकते. तसेच खात्यात येणारी नियमित रक्कम थांबू शकते. त्यासाठी गरजेचे आहे की, आपले PF खाते आधारशी लिंक करावे. UAN सुद्धा आधार वेरिफाइड असणे गरजेचे आहे. 


काय आहेत नवीन आदेश?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

EPFO ने सोशल सेक्युरिटी कोड 2020 च्या सेक्शन 142 अंतर्गत नवा निर्णय घेतला आहे. EPFOने कंपन्यांना निर्देश दिले आहेत. की 1जून नंतर खाते आधारला लिंक नसल्यास किंवा UAN आधार व्हेरिफाइड नसल्यास त्याचे ECR इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न भरला जाणार नाही. अशातच खातेधारकांनाचा कंपनीकडून मिळणारा हिस्सा थांबू शकतो.


PF खात्याला Aadhaar शी लिंक करण्यासाठी 5 सोप्या टीप्स


1. सर्वात आधी आपल्याला EPFOच्या संकेतस्थळावर www.epfindia.gov.inवर लॉग इन करावे लागेल. 


2. त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेस -> e-kyc portal -> link UAN Aadhaar वर क्लिक करावे लागेल.


3. आपल्याला आपला UAN नंबर आणि UAN अकाऊंट रजिस्टर मोबाईल नंबर अपलोड करावा


4. आता तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी नंबर येईल. OTP नंबर सबमिट केल्यानंतर त्याखाली दिल्या गेलेल्या आधार बॉक्समध्ये आपला 12 डिजिटचा आधार नंबर सबमिट करा. त्यानंतर फॉर्म सबमिट करून द्या. 


आता तुमच्या समोर प्रोसिड टू ओटीपी व्हेरिफिकेशन ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा


5. आता पुन्हा एकदा तुम्हाला आधार डिटेल्स वेरिफेकेशन करण्यासाठी आधारला लिंक असणार्या मोबाईल नंबर किंवा ईमेलवर OTP जनरेट करावे लागेल. व्हेरिफिकेशन नंतर आपले आधार आपल्या PF अकाऊंटला लिंक होईल.