मुंबई : पीएफ खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जे पीएफ खातेधारक आपल्या पीएफ खात्यातील रक्कम काढण्याचा विचार करत आहेत त्यांना एक झटका बसण्याची शक्यता आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) पीएफ खात्यातील पैसे काढण्याच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे पीएफ खात्यातील पैसे काढण्याची मर्यादा ठरवण्यात येण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएफ खातेधारक आपल्या काही आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी पीएफ खात्यातील रक्कम काढत आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, पीएफ खात्यातून सलग काढल्या जाणाऱ्या रक्कमेमुळे ईपीएफओ चिंतेत आहे. त्यामुळेच ईपीएफओ एक नवा प्रस्ताव आणण्याचा विचार करत आहे.


या प्रस्तावा अंतर्गत निवृत्तीपूर्वी पीएफ खात्यातून काढण्यात येणाऱ्या रक्कमेतून जास्तीत जास्त किती रक्कम काढू शकतो याची मर्यादा ठरवण्यात येऊ शकते. रिपोर्टनुसार, एखादा व्यक्ती एक महिना बेरोजगार राहीला तर तो व्यक्ती पीएफ रक्कम काढू शकतो.


प्रस्तावानुसार, कुठलीही व्यक्ती एक महिना बेरोजगार राहीला तर संपूर्ण रक्कमेच्या 60% किंवा तीन महिन्यांच्या पगाराबरोबरची रक्कम काढू शकते. दोघांपैकी जी रक्कम कमी असेल ती काढू शकतात.


रिपोर्ट्सनुसार, या प्रस्तावाचा उद्देश फॉर्मल सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कवच तयार करणं असा आहे.


पीएफ खात्यातील रक्कम काढण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने चिंतेत असलेल्या ईपीएफओने गेल्या वर्षीच घर खरेदी करण्यासाठी पीएफ खात्यातून 90% रक्कम काढण्यास मंजुरी दिली होती.