मुंबई : कर्मचारी भविष्य निधी म्हणजेच EPFO चे तुम्ही सदस्य असाल तर तुमच्यासाठी खूषखबर आहे. मंगळवारी EPFO ने घेतलेल्या निर्णयानुसार बेरोजगारांसाठी एक खास बातमी आहे. 


काय आहे निर्णय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखादा कर्मचारी जर महिन्याभरापेक्षा अधिक दिवस बेरोजगार असेल तर तो त्याच्या EPFO अकाऊंटमधून 75% रक्कम काढू शकतो. यामुळे त्याचं अकाऊंट अ‍ॅक्टिव्ह राहण्यास मदत होणार आहे. 


दोन महिने बेरोजगार असल्यास काय?  


श्रम मंत्री संतोष गंगवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, EPFO योजना 1952नुसार जर एखादी व्यक्ती दोन महिने बेरोजगार राहिल्यास उर्वरीत 25% रक्कमदेखील काढून ते खातं बंद करू शकतात. 


सध्याचा नियम काय ?  


सध्या अस्तित्त्वात असलेल्या नियमानुसार, दोन महिने एखादी व्यक्ती बेरोजगार राहिल्यास दोन महिन्यांनंतरच तो पीएफ अकाऊंटमधून रक्कम काढू शकतो. 


फायदा काय ? 


EPFO योजनेचा फायदा केवळ त्याच पीएफ धारकांना मिळेल ज्यांची नोकरी काही कारणांमुळे त्यांना गमवावी लागली आहे. महिन्यात नवी नोकरी मिळेपर्यंत ते पीएकमधील पैशांचा वापर करू शकतात. नव्या योजनेनुसार, एखादी व्यक्ती जुनं पीएफ अकाऊंट त्याच्या नव्या नोकरीसाठीदेखील चालू ठेवू शकतो. पूर्वी 60% असलेली ही मर्यादा आता 75% करण्यात आली आहे.