EPFO: नोकरी करणाऱ्या प्रत्येकाने आजच माहिती करुन घ्या `हा` नियम! अन्यथा म्हातारपणी होईल मोठी अडचण
EPFO Pension Rules: प्रत्येक महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगाराचे 12 टक्के पेन्शन खात्यात जमा होतात. तेवढाच भाग कंपनीकडूनदेखील जमा केला जातो.
EPFO Pension Rules: पेन्शनही आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आयुष्याच्या टप्प्यावर जेव्हा आपण काही कमावत नसू त्यावेळी औषधोपचारसह आपले नेहमीचे खर्च यातून भागतात. त्यामुळे कर्मचारी, कंपनी नोकरी करतानाच पेन्शनसाठी वेगळी रक्कम बाजूला काढत असते. भारतात जितकेजण नोकरी करतायत, त्या सर्वांकडे स्वत:चे पीएफ खाते असेल. भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओद्वारे पीएफ खात्यांचे व्यवस्थापन केले जाते. या खात्याकडे बचत खाते म्हणूनदेखील पाहिले जाते.
प्रत्येक महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगाराचे 12 टक्के पेन्शन खात्यात जमा होतात. तेवढाच भाग कंपनीकडूनदेखील जमा केला जातो. पीएफ खात्यात जमा असलेलेी रक्कम तुम्ही गरजेच्यावेळी काढू शकता. यासोबतच तुम्ही 10 वर्षाहून अधिक काळ पीएफ खात्यात पैसे भरत असाल तर तुम्हाला पैन्शनदेखील मिळू शकते. पण ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम तुम्ही काढलात तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही. पण ही रक्कम नेमकी किती? पेन्शन संदर्भात ईपीएफओचा नियम काय सांगतो? जाणून घेऊया.
पूर्ण पैसे काढलात तर..
पीएफ खातेधारकांच्या खात्यात पगाराची 12 टक्के रक्कम जमा होत असते. इतकीच रक्कम इम्प्लॉयर म्हणजेच कंपनीकडून पीएफ खात्यात जमा केली जाते. कंपनीचे 12 टक्के कॉन्ट्रीब्युशन देते त्यातील 8.33 टक्के इतका भाग पीएफ खाते धारकाच्या पेन्शन फंड म्हणजेच ईपीएसमध्ये जातो. राहिलेली शिल्लक 3.67 टक्के रक्कम खात्यात जाते. खातेधारकाने 10 वर्षाहून अधिक काळ पीएफ खात्यात कॉन्ट्रीब्युशन दिलं असेल तर तो पेन्शन मिळवण्यास पात्र असतो. दरम्यान त्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडली किंवा पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम काढली तरी त्याचा ईपीएस फंड कायम राहतो. तरी त्याला पेन्शन मिळू शकते. पण पीएफ खात्यातील पैशांसहित ईपीएसचे पूर्ण पैसे काढले मग त्याला पेन्शन मिळत नाही.
कोणत्या पीएफ खातेधारकांना मिळेल पेन्शन?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएएफओने ठरवलेल्या नियमांनुसार कोणताही कर्मचारी 10 वर्षांहून अधिक काळ पीएफ खात्यात पैसे जमा करत असेल तर त्याला पेन्शन मिळू शकते. तो कर्मचारी 50 व्या वर्षानंतर पेन्शनसाठी क्लेम करु शकतो.
EPFO: प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मूळ पगार 6 हजार रुपयांनी वाढणार?
ईपीएफओ लवकरच खासगी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढवण्याच्या तयारीत आहे. याबाबतची फाईल जवळपास तयार झाल्याचा दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात औपचारिक चर्चेा होणे बाकी आहे. यानंतर वाढीव पगार जाहीर केला जाणार आहे. मूळ वेतन 15 हजारांऐवजी 21 हजार रुपये करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर होणे बाकी आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. तसेच कर्मचारी ईपीएफओला अधिक पैसे देऊ शकणार आहेत.समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, मूळ वेतनात वाढ करण्याचा विचार अर्थ मंत्रालय करत आहे. एवढेच नव्हे तर सध्याचे मूळ वेतन 15,000 रुपयांवरून 21,000 रुपये करण्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालयाने दिला आहे. पगार मर्यादा वाढवल्यास खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. 1 सप्टेंबर 2014 पासून म्हणजेच जवळपास एक दशकापासून ईपीएससाठी पगार मर्यादा 15 हजार रुपये आहे. आता याबाबत मंत्रालयाकडून लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. असे असले तरी ही घोषणा कधी होणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.