नवी दिल्ली : नोकरदारवर्गासाठी प्रोविडेंट फंड (Provident Fund) एका सेव्हिंग अकाऊंटप्रमाणेच असतं. आपल्या वेतनातून कापून यात पैसे तर जमा होण्यासह त्यावर व्याजही मिळतं. त्यामुळे या अकाऊंटची सुरक्षाही महत्त्वाची आहे. बँक अकाऊंटप्रमाणेच पीएफ अकाऊंटची माहिती लीक होण्याचा धोका असतो. EPFOने याबाबत अलर्टही जारी केला आहे. एक छोटीशी चूक पीएफ खात्यातील डिटेल्स लीक करु शकते. त्यामुळे आपलं खातं अपडेट ठेवणं महत्त्वाचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा पीएफचे पैसे काढण्यासाठी खातेदाराकडून क्लेम फाईल केला जातो. परंतु क्लेम फाईल केल्यानंतर तो रिजेक्ट होता. पीएफचे पैसे काढताना क्लेम रिजेक्ट होण्याची दोन मोठी कारणं असू शकतात. पहिलं कारण केवायसी पूर्ण नसणं आणि दुसरं कारण UAN आणि आधार लिंक नसणं. पीएफ अकाऊंटसाठी  KYC, आधार आणि UAN लिंक असणं आवश्यक आहे. हे डिटेल्स कोणाशीही शेअर करु नये. KYC अपडेट नसल्यास पैसे काढण्यासाठी क्लेम पास होऊ शकत नाही. 


KYC अपडेट करण्यासाठी कर्मचारी आणि संस्था या दोघांनाही ज्वॉइंट रिक्वेस्ट पाठवावी लागते. कर्मचाऱ्याकडून रिक्वेस्ट मिळाल्यानंतर सिस्टममध्ये याची तुलना UIDAI डेटाशी होते. व्हेरिफिकेशननंतर रिक्वेस्ट संस्थेच्या किंवा कंपनीच्या लॉगइनवर पाठवली जाते. त्यानंतर EPFO फील्ड ऑफिसरकडून रिक्वेस्ट व्हेरिफाय झाल्यानंतर, याबाबत KYC प्रोसेसिंग काम सुरु होतं.


KYC अपडेट करण्यासाठी -


- EPFOच्या Unified Portalवर जाऊन UAN आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा


- होम पेज वर Manage>Modify Basic Details सिलेक्ट करा. जर आधार वेरिफाइड असेल तर डीटेल्स एडिट करु शकत नाही


- योग्य डिटेल्स भरल्यानंतर, सिस्टम आधार डेटाशी व्हेरिफाय करेल


- डिटेल्स भरल्यानंतर Update Detailsवर क्लिक करा. त्यानंतर माहिती अप्रुवलसाठी पाठवली जाईल.