EPFOने सुरु केली नवी सेवा, ५ स्टेप्स वापरत जनरेट करा UAN
पीएफ खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
नवी दिल्ली : पीएफ खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
नोकरदार वर्गाला मोठा फायदा
भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या 'ईपीएफओ'ने आपल्या खातेधारकांसाठी एक नवी सेवा सुरु केली आहे. या नव्या सेवेचा प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठा फायदा होणार आहे.
मोबाईल-आधार लिंक असणं आवश्यक
ईपीएफओतर्फे सुरु करण्यात आलेल्या या नव्या सेवेमुळे तुम्ही स्वत:चा UAN क्रमांक जनरेट करु शकता. यासाठी युजर्सचा मोबाईल क्रमांक आधारकार्डासोबत जोडलेला असावा. जर तुमचा मोबाईल क्रमांक आधारकार्डसोबत जोडला नसेल तर तुम्ही UAN क्रमांक जनरेट करु शकत नाही.
UAN जनरेट करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही अगदी सहजपणे UAN क्रमांक जनरेट करु शकता.
असा जनरेट करा UAN क्रमांक
UAN जनरेट करण्यासाठी तुम्हाला ५ सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचा UAN क्रमांक मिळणार आहे. पाहूयात काय आहेत या स्टेप्स...
१) सर्वप्रथम तुम्हाला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकच्या माध्यमातून ईपीएफओ मेंबर पोर्टलवर जावं लागेल. त्यानंतर डायरेक्टर UAN अलॉटमेंटवर क्लिक करा.
२) आता स्क्रिनवर विचारण्यात आलेल्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर ओटीपी (OTP) वर क्लिक करा. तुम्हाला ओटीपी म्हणजेच वन टाईम पासवर्ड तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर मिळेल.
३) मग, ओटीपी टाईप करुन डिस्क्लेमर वर ओके क्लिक करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा.
४) सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारशी संबंधित माहिती द्यावी लागेल. त्यामध्ये तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि जन्म दिनांक याचा समावेश असेल. आता तुम्ही ही माहिती तपासून स्क्रिनवर मागण्यात आलेली माहिती द्या. नंतर कॅप्चा इंटर करा आणि डिस्क्लेमर अॅक्सेप्ट केल्यानंतर रजिस्टरवर क्लिक करा.
५) शेवटी रजिस्टर बटनावर क्लिक करा मग तुम्हाला तुमचा UAN क्रमांक मिळेल. याचा मेसेज स्क्रिनवर पहायला मिळेल.