EPFO : दिवाळीनंतर (Diwali 2022) नोकरदार वर्गाला आनंदाची बातमी मिळणार आहे. थोडक्यात दिवाळीनंतरही त्यांची दिवाळी सुरुच असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार लवकरच पीएफ खातेधारकांमध्ये (PF Account holders) त्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम देऊ करणार आहे. अद्यापही EPFO कार्यालयाकडून यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवरात्रोत्सवापासून व्याजाची परीक्षा...


यंदाच्या नवरात्रोत्सवापासून (Navratri 2022) पीएफ खातेधारक त्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम येईल, अशी आशा बाळगून होते. पण, आता मात्र दिवाळीच्या दिवसांनंतरच त्यांची अपेक्षा पूर्ण होणार आहे. आता कोणाच्या खात्यात नेमकी किती रक्कम येणार आहे, ते मात्र त्या व्यक्तीच्या खात्यात असणाऱ्या रकमेवरून ठरणार आहे. खात्यात जितकी रक्कम असेल, त्यावर सरकारकडून 8.1 टक्के व्याज (interest) देण्यात येणार आहे.


व्याजाचं गणित कसं असतं?


पीएफ खात्यात कंपनी आणि नोकरदार (Employee & Employer) यांच्याकडून पैसे दिले जातात. यामध्ये Basic आणि DA मिळून 24 टक्के भाग जमा होत असतो. पण, पूर्ण रकमेवर व्याज मिळत नाही. तुमच्या पीएफची रक्कम दर महिन्याला जमा झालेली असली तरीही त्यावर व्याज मात्र वार्षिक स्वरुपात मिळतं. EPFO च्या नियमांनुसार आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेला जर पैसे काढले गेलेत, तर ते कमी करुन 12 महिन्यांचं व्याज काढता येतं.


अधिक वाचा : ट्विटरचे हे नवे फीचर पाहून युजर्स होणार खुश!


कशी तपासावी खात्यातील रक्कम?


- PF खात्यातील रक्कम तपासायचं असल्यस सर्वप्रथम EPFO च्या वेबसाईटवर जा.


- इथं Our Services मध्ये ड्रॉपडाऊन करुन 'फॉर एम्पलॉइज For Employees हा पर्याय निवडा.


- यानंतर मेंबर पासबुकवर क्लिक करा. इथे UAN क्रमांक आणि पासवर्ड सबमिट करुन Login करा.


- आता इथे पीएफ अकाऊंट हा पर्याय निवडा. इथे तुम्हाला खात्यातील जमा रक्कम दिसेल.


- तुम्ही मेसेज करुनही खात्यातील रक्कमविषयी माहिती मिळवू शकता.


- यासाठी रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून EPFOHO UAN ENG टाईप करुन 7738299899 या क्रमांकावर पाठवा. मेसेजमधील शेवटची तीन अक्षरं भाषेसाठी आहेत. तुम्हाला मराठीत माहिती हवी असल्यास MAR टाईप करा.