मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO ही अशी प्रणाली आहे. ज्यामध्ये कोणताही ग्राहक आपल्या भविषासाठी निधी जमा करु शकतो. ज्यावरती सरकारकडून चांगला इंट्रेस्ट रेट तसेच. टॅक्समध्ये बेनिफिट मिळते. हे पैसे कोणताही ग्राहक आपल्या रिटायर्मेंटनंतर वापरु शकतात किंवा गरजेनुसार त्याला काढू देखील शकतात. परंतु हे पैसे जर तुम्हाला गरजेसाठी काढायचे असतील, तर त्याला तुमच्या खात्यात येण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी लागतो. परंतु EPFO नवीन प्रणाली तयार करत आहे, ज्याद्वारे तुम्ही एका दिवसात पैसे मिळवू शकता. असे सांगीतले जात आहे की, या प्रणालीद्वारे जर तुम्ही पैसे काढण्यासाठी अर्ज केला तर, तुमच्या ईपीएफशी जोडलेल्या खात्यात पैसे जमा केले जातील आणि त्यासाठी सदस्याला कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे जर झाले तर EPFO ​ची ही एक मोठी सुधारणा असेल, कारण EPF मधून खूप महत्वाच्या कामासाठी पैसे काढले जातात. यामध्ये दिरंगाई न झाल्यास जनतेला मोठा दिलासा मिळेल.


सध्या नियम असा आहे की, पैसे काढण्याचा फॉर्म ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरला जातो.


यामध्ये युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) ची मोठी भूमिका आहे. फॉर्म भरल्यानंतर त्याला मंजुरी मिळते. ते कोणत्याही परिस्थितीत नाकारले जाऊ शकते. पैसे काढण्याची मंजुरी आणि क्रेडिट मिळण्यास बँक किंवा कोणतीही सरकारी सुट्टी असल्यास त्याला दोन ते चार दिवसांचा विलंब होऊ शकतो. मात्र आता ही प्रक्रिया सोपी होणार आहे. EPFO पैसे काढण्याची ही प्रक्रिया सुलभ आणि जलद करणार आहे.


क्लेम सेटलमेंटचे काम २४ तासांत पूर्ण करण्याचा ईपीएफओचा प्रयत्न आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, EPFO ​​ने त्याची फ्रेमवर्क तयार केली आहे. त्यानंतर ड्राफ्ट पेपर तयार करून त्याची मंजुरी घेतली जाईल.


आता हे कसं काम करेल ते पाहूयात
1. UAN पोर्टलला भेट द्या https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/
2. तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा आणि पडताळणीसाठी कॅप्चा टाका.
3. आता 'ऑनलाइन सेवा' टॅबवर जा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून 'क्लेम (फॉर्म-31, 19 आणि 10C)' पर्याय निवडा.
4. पुढील स्क्रीनवर तुमचा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा आणि 'पडताळणी' वर क्लिक करा.
5. आता 'Yes' वर क्लिक करा आणि पुढे जा.
6. त्यानंतर 'ऑनलाइन दाव्यासाठी पुढे जा' वर क्लिक करा.
7. आता क्लेम फॉर्ममध्ये, 'मला अर्ज करायचा आहे' या टॅबखाली तुम्हाला आवश्यक असलेला दावा निवडा.
8. तुमचा निधी काढण्यासाठी 'पीएफ अॅडव्हान्स (फॉर्म 31)' निवडा. मग अशा आगाऊ पैसै काढण्याचे कारण, रक्कम आणि पत्ता द्या
9. आता Certificate वर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा
10. तुम्ही ज्या उद्देशासाठी फॉर्म भरला आहे, त्यासाठी तुम्हाला स्कॅन केलेले दस्तऐवज सबमिट करण्यास सांगितले जाऊ शकते.
11. कंपनीने पैसे काढण्याची विनंती मंजूर केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे मिळतील.
12. बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी साधारणपणे 15-20 दिवस लागतात.


EPFO 24 तासाच्या आत पैसे जमा होण्याबद्दल सांगितले असले तरी, अद्याप ही सेवा सुरु झालेली नाही. त्यामुळे ग्राहकांना यासाठी थोटी वाट पाहावी लागणार आहे.