EPFO Update : सर्वच नोकरदारांना फायदा मिळतो तो प्रोव्हिडंट फंडचा. सरकारतर्फे कर्मचाऱ्यांना या खास योजनाचा आपल्या कंपनीच्या माध्यमातून वापर करता येतो. एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) लवकरच पीएफ खातेधारकांसाठी मोठी खूशखबर देणार आहे. एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात पीएफ व्याजाचे पैसे ट्रान्सफर करणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात 5 लाख रुपये जमा आहेत त्यांना व्याज म्हणून 40 हजार रुपये मिळतील. ही व्याजाची रक्कम लवकरच पीएफ खात्यात ट्रान्सफर केली जाऊ शकते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तूम्ही पीएफ खातेधारक असाल आणि जर तुमच्या खात्यात 5 लाख रुपये जमा असतील तर लवकरच तूमच्या खात्यात 40 हजार रुपयांचे व्याज भरले जाईल. जर हे पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर झाले नाहीत असं तूम्हाला वाटतं असेल तर काळजी करू नका. तूम्ही तोही अपडेट घरबसल्या ऑनलाईन पाहू शकता. 


घरबसल्या असा तपासा तुमचा PF अकांऊट - 
- तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक (Remainings) तपासण्यासाठी epfindia.gov.in या वेबसाईटला भेट द्या. 
- यानंतर तुम्हाला click here to know your epf balance या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- Redirect लिंकद्वारे epfoservices.in/epfo/ च्या पेजवर जा. 
- Members information balance या पर्यायावर क्लिक करा, यानंतर तुम्हाला तुमचा पीएफ खाते क्रमांक आणि तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक येथे टाकावा लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल आणि तुमच्या राज्याच्या EPFO ​​कार्यालयाच्या वेबसाइट लिंकवर क्लिक करावे लागेल.
- शेवटी 'सबमिट' या पर्यायावर क्लिक करा आणि तूम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक स्क्रीनवर लगेचच दिसेल.