नवी दिल्ली : कोरोना व्हायरस, लॉकडाऊनमुळे सामन्य जनतेच्या समस्या वाढत असताना दुसरीकडे बचतीवरील व्याजदर कमी होत असल्याचं चित्र आहे. पीएफबाबत नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओकडून (EPFO) पुन्हा एकदा व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वीच पीएफच्या व्याजदरात कपात करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुंतवणूकीवरील परतावा सातत्याने कमी होत आहे, त्यामुळे भविष्य निर्वाह निधी व्याजदर (Provident Fund interest rate) कमी करण्याचा विचार केला जात आहे. हे व्याज आधी 8.65 टक्के होतं, जे मार्च महिन्यात कमी करुन 8.50 टक्के करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा व्याजदर कमी करण्याचा विचार केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पीएफच्या व्याजदराबाबत निर्णय घेण्यासाठी ईपीएफओ वित्त विभाग, गुंतवणूक विभाग आणि लेखापरीक्षण समिती बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये ईपीएफओ किती व्याजदर देऊ शकते, याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. 


मार्च महिन्याच्या सुरुवातीला नव्या 8.5 टक्के व्याजदराबाबत घोषणा करण्यात आली होती. परंतु यासाठी वित्त मंत्रालयाकडून अद्याप मंजूरी मिळालेली नाही. वित्त मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतरच कामगार मंत्रालयाकडून याबाबत सूचित करण्यात येईल.