सोशल मीडियावर एस्कॉर्ट सर्व्हिस; एका कॉलवर मिळतात मुलींचे फोटो आणि रेट्स; एकच खळबळ
राजस्थानच्या जयपूरमध्ये सोशल मीडियाच्या सहाय्याने एस्कॉर्ट सर्व्हिस चालवली जात आहे. पर्यटकांपासून ते शहरातील अनेक तरुण या एस्कॉर्ट सर्व्हिस दलालांच्या संपर्कात आहेत.
राजस्थानमधील जयपूर शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पण गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमध्ये सध्या जाहीरपणे एस्कॉर्ट सर्व्हिस सुरु आहे. पर्यटकांपासून ते शहरातील अनेक तरुण या एस्कॉर्ट सर्व्हिस दलालांच्या संपर्कात आहेत. या दलालांनी आपले फोन क्रमांक सोशल मीडियावर शेअर करुन ठेवलेले आहेत. इतकंच नाही तर एका व्हॉट्सअप कॉलवर हे दलाल तरुणींचे फोटो आणि रेट्स उपलब्ध करुन देतात. तसंच त्यांच्याकडून जयपूरच्या अनेक ठिकाणांचं लोकेशन सोशल मीडियावर शेअर केलं जात आहे.
शहरात दलाल अत्यंत निर्भयपणे एस्कॉर्ट सर्व्हिस चालवत असताना पोलीस मात्र कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीत. पोलिसांकडून जाणुनबुजून याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जात आहे.
दलालांनी टेलिग्रामपासून ते ट्विटपर्यंत सगळीकडे एस्कॉर्ट सर्व्हिस ग्रुप तयार केले आहेत. यामध्ये शहरातील सर्व महत्वाचे लोकेशनपासून ते तरुणीच्या फोटोपर्यंत सगळं काही पाठवलं जातं. सामन्यांनी याप्रकरणी तक्रार केली जात असतानाही पोलीस मात्र कारवाई करताना दिसत नाहीत. यामुळे अनेक हॉटेल्स, स्पा सेंटर्समध्ये जाहीरपणे देहविक्री सुरु आहे.
कोणीही दाखल करु शकतं तक्रार
सोशल मीडियावर देह व्यापारासाठी महिला आणि तरुणींचा फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी कोणतीही व्यक्ती एफआयआर दाखल करु शकते. अशा प्रकरणात महिला स्वत:ही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत एफआयआर करु शकतात. आयपीसीमधील कलम 292 आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. पोलीस आयपीच्या आधारे आरोपींनी अटक करु शकतात अशी माहिती राजस्थान हायकोर्टाचे वकील नितेश शर्मा यांनी दिली आहे.