नवी दिल्ली : सध्या युनिवर्सल बेसिक इनकम (UBI) या मुद्द्यावरून वादाला सुरुवात झाली आहे आणि बऱ्याच देशांमध्ये याचे परीक्षण देखील केले जात आहे. अशातच इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) यांनी सांगितले की, भारतात जर फूड आणि एनर्जी वरील सबसिडी रद्द केल्यास देशातील प्रत्येक व्यक्तीला वर्षाला २,६०० रुपये यूनिवर्सल बेसिक इनकम म्हणून मिळेल. IMF ने देशातील या समस्येचा बारकाईने विचार केला आहे. द इकॉनोमिक टाइम्‍सच्या वृत्तानुसार, IMF ने जे कॅल्क्युलेशन केले आहे ते वर्ष २०११-१२ च्या डेटावर आधारित आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सबसिडीमधील त्रुटी :
IMF च्या नुसार सध्या सब्सिडीची व्यवस्था आहे. मात्र त्यात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे ज्या वर्गाला लाभ मिळायला हवा, त्यांना तो मिळत नाही. 
२,६०० हा आकडा एका विशिष्ट आधारावर काढला आहे. ज्यामुळे भारतात फूड आणि फ्यूल सब्सिडीची जागा घेईल. 
त्याचबरोबर सबसिडी रद्द करण्यासाठी किंमतीत वाढ करण्याची गरज आहे. यासाठी  IMF ने २०१६ च्या अभ्यासाचा पुरावा दिला आहे. यामुळे यूबीआय साठी फंड उपलब्ध होईल, असे संस्थेचे म्हणणे आहे. 


IMF चे अनुमान :
२,६०० रुपये UBI वर्ष २०११-१२ मध्ये व्यक्तीच्या खर्चावर सुमारे २० % आहे. 
रिपोर्टनुसार UBI लागू केल्यामुळे मिळणारे फायदे राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय आव्हानांना सामोरे जाण्याची योजना सावधगिरीने बनवण्याची गरज आहे.  कारण सबसिडी व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी किंमती अधिक प्रमाणात वाढवाव्या लागतील.