एकीकडे देशात बेरोजगारी आहे, घर कसं चालवायचं हा प्रश्न आहे, काहींची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की दोन वेळचं अन्न मिळणंही मुश्किल झालं आहे. मात्र यात एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. दरवर्षी भारतात लाखो टन अन्नाची नासाडी होत असल्याचं संयुक्त राष्ट्राच्या अहवालात सांगण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१९ या वर्षात जगभरात 93 कोटी 10 लाख टन शिजवलेल्या अन्नाची नासाडी झाली, असं संयुक्त राष्ट्राचा अहवाल सांगतो. जगात उपलब्ध असलेल्या शिजवलेल्या अन्नापैकी नासाडी होणाऱ्या अन्नाचं प्रमाण हे तब्बल १७ टक्के इतकं आहे. घर, भोजनालयं, रेस्टॉरंटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होते. दुर्देवाची बाब म्हणजे घरामध्ये शिजवलेल्या अन्नाची सर्वाधिक नासाडी होते.


पण आशिया खंडातील देशांचा विचार केला, तर भारताचं प्रमाण तुलनेनं कमी आहे.


संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार कोणत्या देशात किती किलो अन्न वाया:


  1. भारतात प्रति व्यक्ती ५० किलो

  2. बांगलादेशमध्ये प्रति व्यक्ती ६५ किलो

  3. मालद्वीपमध्ये प्रति व्यक्ती ७१ किलो

  4. पाकिस्तानमध्ये प्रति व्यक्ती ७४ किलो

  5. श्रीलंकामध्ये प्रति व्यक्ती ७६ किलो

  6. नेपाळमध्ये प्रति व्यक्ती ७९ किलो

  7. अफगाणिस्तानमध्ये प्रति व्यक्ती ८२ किलो


 


अन्नाच्या नासाडी न करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार लोकांना आवाहन करत आहेत, मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. तर दुसरीकडे २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय अन्नधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने मंजुरी दिली आहे.