नवी दिल्ली : देशात झालेल्या रस्ते अपघात ताशी १७ लोक म्हणजे दिवसाला साधारण ४०० जणांचा प्राण जात असल्याची धक्कादायक माहिती रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या संशोधनात पुढे आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे देशात दररोज होणाऱ्या अपघातांची आकडेवारी खंगाळल्यास सर्वाधिक अपघात दुपारी तीन ते संध्याकाळी सहा या वेळेत होत असल्याचं पुढे आलंय.  मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2015मध्ये सर्वाधिक अपघात तामिळनाडूत झालेत...तर अपघाताच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे. 


मंत्रालयानं जारी केलेल्या अहवालानुसार 2014च्या तुलनेत 2015मध्ये रस्ते अपघातांच्या संख्येत अडीच टक्क्यांची वाढ झालीय.  तर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येत जवळपास साडे चार टक्के वाढ झाली. त्यामुळे 2015 मध्ये रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा तब्बल १ लाख 46 हजार १३३ वर जाऊन पोहचलाय..