मुंबई : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ हा चित्रपटाचा येऊन आता अनेक महिने झाले. परंतु पुष्पाचा फीव्हर आजही लोकांवरती आहे. पुष्पाच्या गाण्यापासून ते त्याच्या डॉयलॉगपर्यंत सगळ्यांनाच वेड लागलं आहे. सोशल मीडियावर आपल्याला 'या' संबंधीत अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. हे व्हिडीओ इतके मनोरंजक असतात की, ते पाहण्यापासून आपण स्वत:ला रोखू शकत नाही. त्यात लोक आपली जी काही क्रिएटिव्हिटी वापरतात, त्याला तोडच नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला पोटात दुखेपर्यंत हसू येईल परंतु तरी देखील तुम्ही तुमचं हसणं थांबवू शकणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हायरल व्हिडीओमध्ये सगळे लोक वरातीमध्ये नाचत आहेत. त्यावेळी श्रीवल्लीचे गाणं लागलं आहे. ज्यावरती लोक आनंदाने आणि वेड्यासारखे नाचत आहेत. दृश्य पाहून हा व्हिडीओ नक्कीच मिरवणुकीचा असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.


या गाण्यावर नाचताना सर्वजण अल्लू अर्जुनच्या डान्स स्टेप्सची कॉपी करत आहेत. इथे काही लोक पुष्पाच्या डायलॉगवर ऍक्शन देखील करताना दिसत आहे. परंतु जेव्हा तुम्ही सगळ्यांना पुष्पा सारखे एक पाय खेचत नाचताना पाहाता, तेव्हा तुम्हाला सगळे लोक झोंबी किंवा वेडे झाले असल्याचे वाटतात. ज्यामुळे सगळ्यांना हा व्हिडीओ पाहून हसायला येत आहे.



व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाचे म्हणणे आहे की डान्स करताना लोकांची अवस्था वाईट आहे, तरीही हे लोक नाचताना थकत नाहीत.


हा व्हिडीओ शिवाजी दुबे नावाच्या युजरकडून ट्वीटरवरती ट्वीट केले आहे.