पंजाब : काँग्रेसमधील संकट टळले, सिद्धू यांचे मन वळविण्यात मुख्यमंत्र्यांना यश
Punjab Congress : काँग्रेस हायकमांडने जी जबाबदारी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Punjab chief minister Charanjit Singh Channi ) यांच्यावर सोपवली होती. ती त्यांनी चोख पार पाडली.
मुंबई : Punjab Congress : काँग्रेस हायकमांडने जी जबाबदारी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Punjab chief minister Charanjit Singh Channi ) यांच्यावर सोपवली होती. ती त्यांनी चोख पार पाडली. त्यामुळे पंजाबमधील काँग्रेसचे सरकार तरले आहे. नाराज असलेले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांचे मन वळविण्यात त्यांना यश आले आहे. दरम्यान, सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, हा राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फेटाळून लावला होता. सिद्धू यांचे मन वळविण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर सोपविण्यात आली होती.
नवज्योतसिंह सिद्धू यांनी 28 सप्टेंबर रोजी काँग्रेसच्या पंजाब प्रदेश अध्यक्ष पदाचा अचानक राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये पेच निर्माण झाला होता. एका मंत्र्यांनेही राजीनामा दिला होता. सिद्धू काँग्रेस सोडणार अशी शक्यता होती. मात्र, सिद्धू यांचा राजीनामा काँग्रेसने फेटाळून लावत त्यांना त्याच पदावर कायम ठेवले. त्यानंतर मुख्यमंत्री चन्नी आणि सिद्धू यांच्यात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सिद्धू यांचे मन वळविण्यात यश झाले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि सिद्धू यांनी सर्व काही ठिक आहे, असे स्पष्ट केले. त्यामुळे पंजाबमधील काँग्रेस पक्षाचे सरकार तरले आहे.
काँग्रेसच्या पंजाब युनिटमध्ये सुरू असलेल्या संकटाच्या दरम्यान, समन्वय समितीच्या निर्णयाने पुढील वर्षी विधानसभा निवडणुकांच्या दिशेने राज्यातील प्रश्न सोडवला आहे. काँग्रेसच्या पंजाब प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे नवज्योतसिंह सिद्धू (Congress chief Navjot Singh Sidhu), मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि राज्य मंत्री परगट सिंह आणि राजकुमार वेर्का आणि इतर नेते उपस्थित असलेल्या तीन तासांच्या बैठकीनंतर पॅनेल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पवन गोयल, कुलजित नागरा आणि हरीश चौधरी, पारगट सिंह यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितले, . “सर्व काही ठीक आहे,”
पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान नवज्योतसिंह सिद्धू यांनी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची भेट घेतली. दुसरीकडे, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिल्लीत अमित शाह आणि एनएसए अजित डोभाल यांची भेट घेऊन पंजाबमध्ये परतले आहेत. दरम्यान, अकाली दलाने काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, पक्षाने राज्यात रबर स्टॅम्प सीएम केले आहे.
दरम्यान, पंजाबचे डीजीपी आणि महाधिवक्ता यांची बदली होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पंजाबच्या नवीन डीजीपीसाठी यूपीएससी पॅनेलची शिफारस केली जाईल. प्रमुख निर्णयांसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली जाईल. यात सिद्धू, चन्नी आणि हरीश चौधरी दिसतील. दर आठवड्याला तीन सदस्यीय समितीची बैठक होईल, सर्व मोठे निर्णय फक्त या समितीद्वारे घेतले जातील.