दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचं निधन, मोदींनी व्यक्त केलं दु:ख
भाजपचे वरिष्ठ नेते मदनलाल खुराना यांचं निधन
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते. भाजपचे वरिष्ठ नेते मदन लाल खुराना यांच्या निधनाने पंतप्रधान मोदींना दु:ख झालं आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटलं की, 'मदन लाल खुराना हे दिल्लीमध्ये भाजपल मजबूत करण्यासाठी नेहमी लक्षात ठेवले जातील. फाळणीनंतर दिल्लीला आलेल्या शरणार्थींची तुम्ही खूप सेवा केली. मी खुराना परिवाराच्या प्रती संवेदना व्यक्त करतो.'
मदन लाला खुराना यांच्या कुटुंबात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी आहे. त्यांच्या एका मुलाचं मागच्या महिन्यात निधन झालं. भाजपचे वरिष्ठ नेते असलेले खुराना 1993 ते 1996 पर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री होते. 2004 मध्ये त्यांना राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
भाजपच्या अनेक नेत्यांनी खुराना यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत.
आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव भाजप कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 3 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.