नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आलाय. त्यांनी स्वत: ट्वीट करुन यासंदर्भातील माहिती दिलीय. मी रुग्णालयात काही दुसऱ्या कारणासाठी गेलो होतो. पण टेस्टिंगनंतर कळालं की मी कोरोना पॉझिटीव्ह आहे. गेल्या आठवड्यापासून माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची तपासणी करुन घ्यावी आणि स्वत:ला आयसोलेट करावे असे आवाहन करतोय असे ते ट्वीटमध्ये म्हणाले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. भारतात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे मृतांच्या संख्येमध्ये सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली. एका दिवसात या महामारीमुळे देशात प्रथमच 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी भारतात कोरोनाचे 44,386 नवीन रुग्ण आढळले असून आणि 1007 लोकांचा मृत्यू झाला आहे.



गेल्या 24 तासांत कोरोनामधून 1007 मृत्यू
गेल्या 24 तासात 44,386 रुग्ण वाढले.
एकूण कोरोना रुग्णांची संख्या 22,15,075
एकूण मृतांची संख्या 44,386
एकूण ऍक्टीव्ह रुग्ण 6,34,945
बरे झालेल्या रूग्णांची संख्या 15,35,744


राज्यानुसार आकडेवारी


अंदमान आणि निकोबार
कोरोना संक्रमितांची संख्या - 1,351
बरे झालेल्या रूग्णांची संख्या - 500
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या - 20