मुंबई : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अतिदक्षता विभागातून खासगी वॉर्डमध्ये आणण्यात आले आहे. त्यांना रविवारी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्वेदीक संस्थान (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते. छातीत दुखणे आणि श्वास घेण्याचा त्रास त्यांना जाणवत होता.  दरम्यान त्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट देखील आलाय. हा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहीत देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णालयाशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपचार पद्धतीला ते चांगला प्रतिसाद देत आहेत. सोबतच आता या आधारे त्यांच्यावर पुढील उपचारही करण्यात येणार आहेत.


सध्या त्यांना डॉक्टरांनी निरिक्षणाअंतर्गत ठेवलं आहे, असंही रुग्णालयाकडून सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 



देशाचं पंतप्रधानपद भूषवणारे सिंग हे सध्या राजस्थानच्या वतीने राज्यसभेचे सदस्य आहेत. डॉ. मनमोहन सिंह हे भारताचे १३ वे पंतप्रधान आहेत.


ज्यांचा कार्यकाल हा २००४ ते २०१४ इतका राहिला आहे. शिवाय ते एक प्रख्यात अर्थतज्ज्ञही आहेत.


या व्यतिरिक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं गव्हर्नर पदाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली होती.