बिहारमधील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, यांना मिळाली संधी
बिहारमधील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. नितीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळात २७ मंत्र्यांनी शपथ घेतली.
पाटणा : बिहारमधील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. नितीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळात २७ मंत्र्यांनी शपथ घेतली.
जेडीयु १४, भाजप १२ आणि एलजेपी १ अश्या एकुण २७ जणांनी शपथ घेतली. बिहारच्या सुपौलमधून आमदार असलेल्या विजेंद्र यादव यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. तर नालंदाचे जेडीयु आमदार श्रवण कुमार यांना मंत्रिमंडळात जागा मिळाली. राजभवनमध्ये राज्यपालांनी मंत्र्यांना पद आणि गोपनियेतीची शपथ दिली.
दरम्यान, एकूण १४२ सदस्यांच्या बिहार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला १२२ आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. १३१ आमदारांच्या पाठिंब्यासह एनडीएनं हा बहुमताचा आकडा सहज पार केला. संयुक्त जनता दलाच्या ७१, भाजपच्या ५२, राष्ट्रीय लोकसमता पक्ष व लोकजनशक्ती पक्षाच्या प्रत्येकी २, 'हम'च्या १ आणि तीन अपक्ष आमदारांनी नितीशकुमारांच्या बाजूनं मतदान केले होते.