नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार (Unnao rape Case) पीडितेच्या वडिलांच्या हत्येसंदर्भातील (murder of Unnao rape survivor`s father) खटल्यात भाजपचा माजी आमदार कुलदीपसिंह सेंगर (Kuldeep Singh Sengar) याच्यासह सात जणांना दिल्ली न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवले. आता त्यांच्या शिक्षेवर १२ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी त्यांना भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलमाखाली षडयंत्र रचने, गुन्हेगारी हत्या, पुरावे नष्ट करणे, चुकीचे रेकॉर्ड तयार करणे आणि एखाद्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध करणे आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये दोषी मानले. ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली ती अत्यंत अमानुष होती, असं निरीक्षण नोंदवत दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगरला दोषी ठरवलं. या प्रकरणात माजी आमदार कुलदीपसिंह सेंगरसोबत ११ आरोपी होते. यापैकी ४ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर इतर ७ जणांना न्यायालयाने दोषी ठरवले. १२ मार्च रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. 


दरम्यान, सात जणांना दोषी ठरवण्यात आले त्यापैकी दोन जण उत्तर प्रदेश पोलीस दलातील अधिकारी आहेत. हा माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक खटला होता, असे सांगत न्यायाधीशांनी सीबीआय आणि पीडितेच्या वकिलांचे कौतुक केले. तुम्हाला काही बोलायचे आहे का, असे दोषी सेंगरला विचारण्यात आले. यावेळी आपण निर्दोष असल्याचे कुलदीपसिंह सेंगर म्हणाला. त्यावेळी न्यायालयाने चांगलेच फटकारले. तुम्ही तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला, असे न्यायालयाने यावेळी सुनावले.


उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांचा न्यायालयीन कोठडीत ९ एप्रिल २०१८ रोजी मृत्यू झाला होता. पीडित महिलेचे सनगारमध्ये २०१७ मध्ये अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता.


0