मुंबई : देशाबाहेर फिरायला जाण्याआधी तुमच्याकडे पासपोर्ट असणे गरजेचे असते.  कारण ती देशाबाहेर तुमची खरी ओळख असते. पासपोर्टमुळे जगभरात तुमची भारतीय म्हणून ओळख निश्चित होते. परंतु भारतीय पासपोर्टची काही वैशिष्ट्ये आहेत. ती जाणून घेऊ या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगवेगळ्या रंगाचे पासपोर्ट


पासपोर्ट भारत सरकारद्वारे जारी केले जातात. पूर्वी पासपोर्ट बनवायला खूप वेळ लागत असे. पण आता तुम्ही सहज बनवू शकता. भारतीय पासपोर्ट लाल, निळा, पांढरा आणि केशरी अशा चार रंगात उपलब्ध आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे वेगवेगळ्या रंगात पासपोर्ट का बनतात? आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत.


लाल रंगाचा पासपोर्ट


तो केवळ परराष्ट्र सेवेतील अधिकारी, उच्चायुक्त संबंधित अधिकार्‍यांना जारी केला जातो. कारण ते परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करतात. सामान्य पासपोर्टपेक्षा वेगळे असल्यामुळे त्यांची ओळख लवकर होऊ शकते. त्याची एक खास गोष्ट म्हणजे परदेशात अशा पासपोर्ट धारकांवर गुन्हा दाखल करणे किंवा कोणतीही कारवाई करणे सोपे नाही. 


या पासपोर्टच्या लोकांना सामान्य लोकांपेक्षा अधिक सुविधा असतात, तसेच प्रवासासाठी कोणत्याही व्हिसाची आवश्यकता नसते  एवढेच नाही तर त्यांना इमिग्रेशनमध्येही जास्त वेळ लागत नाही.


पांढर्‍या पासपोर्टचे वैशिष्ट्य


पांढर्‍या रंगाचा पासपोर्ट सरकारी अधिकाऱ्यांसाठी असतो. सरकारी कामासाठी परदेशात जाणाऱ्या अधिकाऱ्यांना या रंगाचा पासपोर्ट दिला जातो. कस्टम चेकिंगच्या वेळी त्यांच्याशी तशाच प्रकारे व्यवहार केला जातो. पांढरे पासपोर्ट धारण करणाऱ्यांना काही विशेष सुविधाही मिळतात ज्यामुळे त्यांचा प्रवास सुकर होतो.


निळा पासपोर्ट


हा पासपोर्ट देशातील सामान्य नागरिकांसाठी जारी केला जातो. या पासपोर्टमध्ये नागरिकाचे नाव असते. त्यासोबत जन्मतारीख, जन्माचे स्थळ यांचा उल्लेख असतो.  फोटो, स्वाक्षरी आणि त्याच्याशी संबंधित माहितीही या पासपोर्टमध्ये असते.. या पासपोर्टचा रंग वेगळा ठेवण्यात आला आहे कारण तो अधिकारी आणि सामान्य नागरिकांमध्ये फरक दर्शवू शकतो.


केशरी पासपोर्ट


याशिवाय भारत सरकारकडून नागरिकाची ओळख म्हणून केशरी रंगाचाही पासपोर्ट दिला जातो. हा पासपोर्ट 10 वी पर्यंत शिक्षण झालेल्या नागरिकांसाठी असतो. यावर वडिलांचे नाव, सध्याचा पत्ता आणि अन्य महत्वपूर्ण माहिती असते.