Crime News : लग्न झाल्यानंतरही अनेकांचे बाहेर अफेर असतात. मात्र या अफेरचा भांडाफोड झाल्यावर अनेकांचे संसार मोडल्याची अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. अशातच एक असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये नवऱ्याने बायकोला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. (Devar bhabi wife News) मात्र त्यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराने जे केलं त्याने थरकाप उडाला आहे. (extra marital affair Devar bhabi wife finish husband with help of her friend marathi Crime News) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय आहे प्रकरण?
पती राजेश कुमार वडोदरामध्ये काम करत होता त्यासोबत त्याचा मित्र सुमेरही काम करायचा. दोघे कायम सोबत असायचे, दोघांची दोस्तीही तेवढी कट्टर होती. ते एकमेकांच्या घरी येत जात असायचे. घरी येत जात असताना सुमेरचं राजेशच्या पत्नीसोबत सुत जुळलं.  दोघांमध्ये अनैतिक संबंध असतात. 


जास्त दिवस राजेशपासून लपू शकलं नाही एक दिवस राजेश त्याच्या पत्नीला आणि सुमेरला नको त्या अवस्थेत पाहतो. राजेश पत्नीला सुनावतो मात्र पत्नी आणि सुमेर त्याच्याच हत्येचा कट रचतात. राजेशला मारून एकमेकांशी विवाह करण्याचं दोघांचं ठरतं. 


असा रचला कट
राजेशची दोघे हत्या करतात त्यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी दोघे राजेशने गळफास घेत जीवन संपवल्याचं दाखवण्यासाठी त्याला फाशी देतात. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी येण्याअगोदर दोर कापतात. पोलीस जेव्हा राजेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवतात. शवविच्छेदन अहवालामध्ये राजेशचा मृत्यू हा श्वास अडकून झाल्याचं स्पष्ट होतं. पोलिसांनी दोघांना अटक केली असून ही घटना उत्तर प्रदेशमधील रायबरेली इथली आहे.