Viral: पत्नी आणि प्रेयसी दोघी पण हव्यात, व्यक्तीचा अजब जुगाड; पठ्ठ्याने गर्लफ्रेंडचं...
Viral News : भारतात एक विचित्र घटना समोर आली आहे. पत्नी आणि गर्लफ्रेंड दोन्ही हव्यात म्हणून त्या पठ्ठ्याने अजब कारनामा केलाय.
Extra Marital Affair : विवाहबाह्य संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. एक अशीच विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये पती-पत्नी आणि बाहेरवाली अस प्रकरण समोर आलंय. पतीचे विवाहबाह्य संबंध होते, त्याला पत्नी आणि गर्लफ्रेंड दोघीपण हव्या होत्या. त्यासाठी या पठ्ठ्याने अजब कारनामा केला. यांची प्रेम कहाणी अतिशय विचित्र आहे. हे प्रकरण बखरपूर गढी भागातील असून किरतपूर येथील रहिवासी असलेल्या एका तरुणीने हे प्रकरणा उघड केलंय.
नेमकं काय आहे हे प्रकरण?
पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये ग्रामपंचायत सचिव दारा सिंह आणि तिची ओळख झाली. या ओळखीच रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. सहा महिन्यांनंतर तिला कळलं की दारा हा विवाहित आहे. त्यानंतर तिने त्याच्याशी संबंध तोडण्यासाठी अनोनात प्रयत्न केले. त्याच्या विरोधात पोलिसांकडे जाऊ गुन्हा दाखल करेल असंही सांगितलं. पण त्याने प्रेमाची शपथ घातली आणि तिच्या पतीला तो घटस्फोट देऊ तिच्याशी लग्न करेल असं सांगितलं. तिचा खर्चही सर्व तो उचलेल असंही त्यांनी सांगितलं. पण लग्नाच्या बहाण्याने तिचं लग्न त्याने मेहुण्यासोबत लावून दिले. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. कारण दारा सिंग सोबत तिचे संबंध होते. अशा परिस्थितीत तिचं नातं संपुष्टात आलं. लग्न मोडल्यानंतरही दारा सिंग तिला भेट होता. एकदा त्यांच्यामध्ये शारीरिक संबंधही झाले. त्यामुळे तिला दिवस गेले. पण ही बातमी कळल्यानंतर दारा सिंग गायब झाला आणि तो आता तिच्यासोबत राहत नाही.
हेसुद्धा वाचा - लेडी कॉन्स्टेबलने SI ला फोन केला अन् प्रेमाने विचारलं- 'कुठे आहेस, ये ना', पुढे जे झालं ते...
त्यामुळे पीडित महिला पोलिसांकडे पोहोचली आणि तिने दारा सिंगविरोधात फसवणूक आणि बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. तिने पोलिसांना पुढे सांगितलं की, 'मी दारा सिंगला हेही म्हणाले की मी आणि माझं मूल कुठे जाणार आहे. त्यावर दारा सिंग म्हणाला तिच्याशी काहीही संबंध नाही. तो ना मला घरात ठेवायला तयार आहे ना माझ्याशी लग्न करायला तयार आहे. तो अजूनही माझा छळ करत आहे. तो मला शिवीगाळ करत असतो. आता काय करावे आणि कोणाकडे मदत मागावी हे समजत नाही.' यानंतर आता पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून दारा सिंगला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करून कारागृहात रवानगी झालीय.