राजगढ जिल्ह्यातील बिओरा इथे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जे पोलीस आपल्याच संरक्षतेसाठी सदैव तत्पर असता त्याच पोलिसांना एकमेकांचा घात केलाय. तोही प्रेमासाठी गुन्हाचा मार्ग निवडला आहे. लेडी कॉन्स्टेबल पल्लवी सोलंकीच्या प्रकरणात नवं नवीन खुलासे होत आहेत. एका सब इन्सपेक्टरला त्याच्या कॉन्स्टेबल गर्लफ्रेंडने कारने चिरडून ठार केल्याची बातमी समोर येत आहे. त्याच्या दुचाकीला कारने जोरदार धडक देत 30 मीटरपर्यंत फरफटत नेले आणि त्याचा जीव जात नाही तोपर्यंत त्याला ठार मारलं. लेडी कॉन्स्टेबल पल्लवी सोळंकी असं तिच नाव आहे. पल्लवी आणि प्रियकर करण ठाकूर यांच्या प्रेमात सब इन्स्पेक्टर दीपंकर गौतम हे अडथळा ठरत असलेल्या यांची हत्या करण्यात आली. एवढंच नाहीतर अडीच तासात संपूर्ण घटना घडल्यानंतर त्यांनी पोलीस गाठून अपघाताची खोटी कहाणी या दोघांनी रचली.
10 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता पल्लवीने उपनिरीक्षक दीपंकर गौतम यांना भेटण्यासाठी बोलावलं. दिपंकर तेथे पोहोचला तेव्हा तिचा प्रियकर करण ठाकूर घटनास्थळी आधीपासून उपस्थित होता. यादरम्यान करणने दीपंकरला धमकी देत आमच्या प्रेमात येऊ नकोस, अन्यथा तुला परिणामांना सामोरे जावे लागेल, असं सांगितलं. परिस्थितीची निकड पाहून दीपंकर तेथून दुचाकीवरून निघून गेला. दरम्यान, वाटेत त्याने आपल्या इन्स्पेक्टर मित्राला मदतीसाठी बोलावलं. दीपंकर घरी परतत असताना लेडी कॉन्स्टेबल आणि तिच्या प्रियकराने त्याला मागून आलेल्या कारने चिरडलं. कारने चिरडल्यानंतर दोघांनीही अपघाताची खोटी कहाणी रचून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर खोटे उघड झालंय. पोलिसांनी दोघांनाही अटक केलीय.
पल्लवी आणि करण ठाकूर अनेक वर्षांपासून प्रेमात होते. पण अचानक पल्लवीच लग्न दुसरीकडे ठरवण्यात आलं. या रागात करण ठाकूरने 2 डिसेंबर 2020 ला पल्लवी सोलंकीवर गोळीबार केला. त्यात पल्लवी जखमी झाली होती. त्यानंतर करणची तुरुंगात रवानगी करण्यात आली. या घटनेनंतर पल्लवी कामात मग्न झाली. काही दिवसांनी करण तुरुंगातून बाहेर आला आणि राजगडमधील पाचोर इथे पल्लवीसोबत राहू लागला.
करण तुरुंगात होता तेव्हा तिची भेट तिच्याच विभागात काम करणाऱ्या दीपंकर गौतमशी झाली. दीपंकर हा विवाहित होता. लव्ह केलेल्या दीपंकरची पत्नी यूपीमधील सरकारी शाळेत शिक्षिका होती. त्यामुळे दीपंकर इथे एकटा राहत होता. अशा पल्लवी प्रेयकराच्या विरहात होती. अशात या दोघांची मैत्री झाली आणि नंतर ते दोघं प्रेमात पडले. पल्लवी दीपांकरला भेटायला बायोरा इथे येत असे. कधी कधी दीपंकर वेळ काढून पल्लवीला भेटायला पाचोरला जात असे.
दरम्यान, करण जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याला पल्लवी आणि दीपंकर यांच्या प्रेम संबंधाची भनक लागली. त्याने पल्लवीला त्याच्या जुन्या प्रेमाची आठवण करुन दिली आणि तिला दीपंकरला सोडण्यास सांगितलं. पल्लवीने दीपंकरला फोन करून बिओराला भेटायला सांगितलं. दिपंकर तेथे पोहोचताच करणने त्याला धमकी दिली. दीपंकर दुचाकीवरून परतत असताना करणने पल्लवीला विश्वासात घेऊन कारमध्ये बसवलं. बिओरा येथे महामार्गावरून जात असलेल्या दीपंकर यांना मागून येणाऱ्या कारने चिरडलं. ज्यात दीपंकरचा जागीच मृत्यू झाला.