पत्नीचे तरूणासोबत अनैंतिक संबध, पतीने उचलंलं टोकाचं पाऊल, मात्र चिठ्ठीने एकच खळबळ
Shocking Story :महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या हितेश पाल या व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेपुर्वी त्याने एक सुसाईट नोट लिहली होती.या नोटमध्ये त्याने पत्नीचे अनैतिक संबंध, (Extra mariatal Affair) त्याच्या हत्येचा प्रयत्न आणि प्रॉपर्टी बळकावण्यासंबंधित अनेक आरोप केले आहेत.
Shocking Story : देशभरात विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या संबंधांमुळे गुन्ह्यांच्या घटनांमध्ये तितकीच वाढ झाली आहे.अशीच एक अनैतिक संबंधाची (Extra mariatal Affair) घटना समोर आली आहे. या घटनेत एका पतीने पत्नीच्या अनैतिक संबंधाला व तिच्या छळाला कंटाळून आय़ुष्य संपवलं. या घटनेने पत्नीच्या अनैतिक संबंधांचा मार्ग मोकळा झाला असला तरी पतीने लिहलेल्या एका चिठ्ठीने मात्र मोठी खळबळ उड़वून दिली.नेमके त्याने या चिठ्ठीत काय लिहलयं? व संपुर्ण घटनाक्रम काय आहे? हे जाणून घेऊयात
पतीचा टोकाचा निर्णय़
महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या हितेश पाल या व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेपुर्वी त्याने एक सुसाईट नोट लिहली होती.या नोटमध्ये त्याने पत्नीचे अनैतिक संबंध, (Extra mariatal Affair) त्याच्या हत्येचा प्रयत्न आणि प्रॉपर्टी बळकावण्यासंबंधित अनेक आरोप केले आहेत. ही सुसाईट नोट घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना सापडली आहे, त्यामुळे पत्नीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सुसाई़ड नोटमध्ये काय?
"माझी पत्नी नीतू पालचे कृष्णा राठौरसोबत अनैतिक संबंध आहेत. हे लोक मला जीवे मारण्याची धमकी देतात. त्यांनी मी अनेकदा बागेत रंगेहाथ पकडले आहे. मात्र ती तिच्या प्रियकराला भाऊ असल्याचे मला नेहमी सांगायची, असा आरोप हितेशने नीलूवर केला होता.
मी गेल्या काही दिवसांपासून नीतू आणि कृष्णा यांच्या व्हॉट्सअॅप चॅटवर लक्ष ठेवून होतो. मला चॅटमधून अशी माहिती मिळाली की, बागेत भेटल्यानंतर नीतू कृष्णाच्या घरी जायची. ती कृष्णाला महागड्या भेटवस्तू द्यायची. त्यांच्यामध्ये पैशांचे व्यवहार ही व्हायचे. काही दिवसांपूर्वी नीलूने तिचा प्रियकर कृष्णाला एक मोठी कार देखील भेट दिली होती. ही गाडी नीलूच्या नावावर होती,असेही त्याने नोटमध्ये म्हटलेय.
स्लो पॉयझन देऊन मारायचा प्रयत्न
या दोघांची आणखीण एक महिला साथीदार आहे, तिचे नाव राणी उदासी आहे. नीतू, कृष्णा आणि राणी हे तिघेही माझ्या घरी एकत्र तंत्र-मंत्र करत असत. तसेच गेल्या 1 वर्षापासून स्लो पॉयझन देत होते. यामुळे मी सुस्त होऊ लागलो. माझे संपूर्ण शरीर काळे पडले आहे. हे सर्व शवविच्छेदन अहवालात कळणार आहे. पोलीस प्रशासनाला (POLICE) विनंती आहे की त्यांनी दोघांच्या व्हाटसअॅप चॅटची (Whatsapp Chat) चौकशी करून शिक्षा द्यावी.
प्रॉपर्टीही नावावर केली
पती त्याच्या सुसाईड नोटमध्ये पुढे आरोप करतो की, पत्नीने त्याला काहीतरी खाऊ घालून संपूर्ण मालमत्ता आपल्या नावावर करून घेतलीय. तिला मला मारायचे होते. त्यामुळेच त्यांनी सर्व कागदपत्रांच्या नॉमिनेशनमध्ये आपले नाव टाकले आहे. माझ्या मृत्यूला हे तीन लोक जबाबदार आहेत, असा आरोप पतीने केला आहे. आणि मृत्यूनंतर ही संपत्ती त्याचा मुलगा युवराज आणि आई-वडिलांना द्यावी, अशी विनंती त्यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे.
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदूरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणात पतीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तपास अधिकारी बीएस कुमरावत यांनी सांगितले. तसेच मृताच्या पत्नीचे अनैतिक संबंध चव्हाट्यावर आले आहेत. शवविच्छेदनानंतर पुढील कारवाई केली जाईल,असे पोलिसांनी (Police) सांगितले आहे.