भाजप नेत्याला पत्नीने भाजपच्याच महिला नेत्यासह पकडलं रंगेहाथ, Video Viral
भाजप नेत्याला त्याच्या Girl Friend सोबत असताना रंगेहाथ पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल
Crime News : भाजप नेत्याला प्रेयसीसोबत पत्नीसह नातेवाईकांनी रंगेहाथ पकडल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर भाजप नेत्याला फ्री स्टाईल चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोहित सोनकर असं भाजप नेत्याचं नाव आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मोहित सोनकर हे कानपूर-बुंदेलखंडचे प्रादेशिक मंत्री आहेत. मोहित यांचा विवाह मोनी सोनकर यांच्याशी सहा वर्षांपूर्वी झाला होता. मोहित ज्या महिलेसोबत सापडले त्याही भाजपच्या नेत्या आहेत. दोघांचं अफेर चालू होतं. सोनकर यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे त्यांची अनेकवेळा पत्नीसोबत वाद होत होते.
बिंदु गोयल असं मोहित यांच्यासोबत सापडलेल्या भाजपच्या महिला नेत्याचं नाव आहे. बिंदु गोयल आणि मोहित एकत्र सापडल्यावर मोहित यांच्या पत्नीचा पारा चढला तिने चपलीने मारहाण केली. मोहितच्या पत्नीच्या भावांनीही त्याला मारलं. एवढंच नाही तर मोहितची पत्नी आणि सासरच्यांनी बिंदु गोयल यांनाही चोप दिला.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी आल्यावर त्यांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी दोन्ही पक्षाकडून अद्याप कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.