सासऱ्याने सूनेला त्या अवस्थेत पाहिलं म्हणून उलगडलं ते हत्याकांड!
सासऱ्याने त्या रात्री असं काय पाहिलं ज्यामुळे मुलाच्या हत्येचा झाला उलगडा!
Crime News : लग्नानंतरही अनेकांचे बाहेर संबंध असलेली अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं आहे. महिलेने तिच्या प्रियकराचाच्या मदतीने आपल्याच पतीला संपवलं होतं. मात्र हे प्रकरण काही समोर आलं नव्हतं. परंतु एक सासऱ्याने सूनेला ज्या अवस्थेत पाहिलं तेव्हा पाहिल्यावर मोठा गुन्हा उघडकीस आला.
असं नेमकं काय पाहिलं?
ही घटना राजस्थानमधील असून पवन शर्मा तरूणाचा विवाह 3 जून 2015 ला रीमासोबत झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुलंही झालीत. यादरम्यान रीमाचं शेजारच्या भागेंद्र उर्फ भोलासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही रात्री चोरून भेटत होते. मात्र एक दिवशी पवनला दोघे सापडतात. दोघांनी 29 मे 2022 ला मिळून पवनची हत्या केली आणि मृतदेह जवळच्या कालव्यात फेकून दिला.
पवनची हत्या केल्यानंतर दोघांना रान मोकळंच झालं. नेहमीप्रमाणे दोघांचे अवैध संबंध सुरूच होते. पवन घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र 16 ऑक्टोबरला रात्री पवनच्या वडिलांना रीमा आणि भोलासह रंगेहाथ सापडली.
दोघांच्या अफेरबद्दल माहिती होताच पवनच्या वडिलांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. दोघांवर संशय व्यक्त करत पुन्हा एकदा पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत महिला व तिच्या प्रियकराला अटक करून चौकशी केली. त्यानंतर दोघांनी पवनची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकल्याची कबुली दिली. कालव्यातून पँट आणि मृतदेहाचे काही अवशेष सापडले आहेत.