केरळ : फारूक ट्रेनिंग कॉलेजच्या असिस्टेंट प्रोफेसरने मुस्लिम विद्यार्थ्यांनी विरोधात आपत्तीजनक टिपणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थिनींनी याबाबत कॉलेजच्या बाहेर कलिंगड मार्च करून विरोध दर्शवला आहे. हे प्रदर्शन फेडरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत घेण्यात आला होता. विद्यार्थिनींनी हातात तुकडे घेऊन प्रोफेसर विरोधात निदर्शने केली. 


काय आहे हा प्रकार? 


कॉलेजचे शिक्षक जौहर मुनव्वर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा विरोध करण्यात आला. त्यांनी असं म्हटलं की, मुस्लिम मुली हिजाब घालत नाही. आणि कलिंगडप्रमाणे आपली छाती घेऊन चालतात. इस्लाम धर्माच्या नियम - कायद्यांचे उल्लंघन करत आहेत. आणि हे चुकीचं आहे. 


शिक्षकांनी हे देखील म्हटलं होतं की, कॉलेज परिसरात 80 टक्के मुली आहे. ज्यामध्ये सर्वाधिक मुली या मुस्लिम समाजाच्या आहेत. या मुस्लिम महिला हिजाब वापरत नाही. त्यांच शरिर पुरूषांना आकर्षित करणार आहे. इस्लाममध्ये याला छाकण्यास सांगितलं आहे. त्यामुळे महिलांनी स्वतःला डोक्यापासून पायापर्यंत शरीर झाकून ठेवलं पाहिजे.