मुंबई : सोशल मीडिया कंपनी 'फेसबुक' पुढच्या आठवड्यात आपल्या कंपनीला नवीन नावाने रिब्रँड करण्याची योजना आखत आहे. द व्हर्जमधील एका अहवालानुसार, फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकेरबर्ग 28 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या कनेक्ट कॉन्फरन्समध्ये नाव बदलण्यावर चर्चा करू शकतात. अहवालात असे म्हटले गेले आहे की रिब्रँडिंगबद्दलच्या बातम्या यापेक्षा लवकर येऊ शकतात.


फेसबुक ऍपच्या ब्रँडिंगमध्ये नाही होणार बदल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकच्या मूळ ऍप आणि सेवेच्या ब्रँडिंगमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. हे एका मूळ कंपनीच्या अंतर्गत ठेवले जाईल ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये लाखो युझरसह इंस्टाग्राम आणि व्हॉट्सऍप सारख्या इतर ब्रँडचा समावेश असेल. Google ने Alphabet ची मूळ कंपनी बनवून आधीच अशीच रचना राखली आहे. रीब्रँडिंगनंतर, फेसबुकचे सोशल मीडिया ऍप हे मूळ कंपनीच्या अंतर्गत उत्पादन होईल. इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍप, ऑकुलस इत्यादी प्लॅटफॉर्म देखील या मूळ कंपनीमध्ये येतील.


झुकरबर्गने 2004 मध्ये सोशल नेटवर्कची सुरूवात झाली. त्यांनी सांगितलं की, फेसबुकच्या भविष्याकरता महत्वाची गोष्ट मेटावर्स कॉन्सेप्ट आहे. ही एक आयडिया आहे.ज्यामध्ये युझर्स एका वेगळ्या वर्च्युअल आयुष्यात जगणार आहे. जिथे ते वेगळं काम करणार आहेत. एक्सरसाइज करणार आहेत. कंपनीचं Oculus वर्च्युअल रिऍलिटी हॅडसेट आणि सर्विस त्यांच्या भविष्याच्या कल्पनेचा भाग असणार आहे.


मेटावर्स कंपनी म्हणून ओळख बनवण्याचा उद्देश


झुकरबर्गने जुलैमध्ये सांगितले की, येत्या काही वर्षांमध्ये, लोकांनी त्यांच्या मुख्यत्वे सोशल मीडिया कंपनीऐवजी मेटावर्स कंपनी म्हणून पाहण्याची अपेक्षा केली आहे. तो म्हणाला की, मेटावर्स सोशल टेक्नोलॉजीचं खरं एक्सप्रेशन आहे.  कंपनीला अमेरिकन सरकारकडून त्याच्या व्यावसायिक क्रियाकलापांवर वाढत्या पाळत ठेवण्याचा सामना करावा लागत आहे. तिथल्या दोन्ही पक्षांच्या खासदारांनी कंपनीवर टीका केली आहे, ज्यामुळे फेसबुकबद्दल काँग्रेसमध्ये वाढता राग दिसून येतोय. सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांनी त्यांच्या सेवांचा विस्तार करण्यासाठी नावे बदलणे असामान्य नाही. गुगलने 2015 मध्ये होल्डिंग कंपनी म्हणून अल्फाबेट इंकची सुरुवात केली. यासह, सर्च आणि जाहिरात व्यवसायाच्या पलीकडे विस्तार करणे हेच त्यांचे ध्येय होते.