मुंबई : बहुतेक लोकांकडे एक ना एक तरी वाहन असतंच आणि ते वाहन चालण्यासाठी आपल्याला पेट्रोल किंवा डिझेलची गरज पडते. ज्यासाठी आपण पेट्रोल पंपावरती जातो. तेथे गेल्यावर आपण तेथील व्यक्तीला आपल्याला किती लिटर किंवा किती रुपयाचे इंधन पाहिजे हे सांगतो. ज्यानंतर ते तेथील मशीनवरती तो आकडा टाकतात आणि एका पाईपद्वारे इंधन किंवा पेट्रोल आपल्या गाडीत टाकतात. आता आपल्या इथपर्यंत तर सगळं माहित आहे. परंतु तुम्ही विचार केलाय का, की या मशीनमध्ये किंवा त्या पाईपमध्ये पेट्रेल येतं कुठुन? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या इंधनाच्या टाक्या कुठे असतात? आणि त्या टाक्या आपच्या घरच्या टाक्यांसारख्याच असतात की, त्या विशिष्ट पद्धतीने बनवल्या गेल्या आहेत? असा प्रश्न पडतो. तर आज आम्ही पेट्रोल पंपाच्या इंधन साठवणुकीच्या यंत्रणेबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पेट्रोल पंपामध्ये इंधन कसं साठवून ठेवलं जातं आणि ते कसं आपल्यापर्यंत पोहोचतं हे कळेल.


पेट्रोल पंपावरील टाक्या या पेट्रोल पंपाच्या खाली असतात. त्यामुळे ट्रकमधून येणारे तेल पेट्रोल पंपावर बांधलेल्या भूमिगत टाकीमध्ये साठवले जाते.


अशा स्थितीत ज्या मशीनमध्ये पैसे, दर आदी माहिती दिली जाते, ती मशीन एक प्रकारे हातपंपाचे काम करते आणि तेथून तेल निघते. या मशीनमधील इंधन थेट टाकीतून येते. तसेच पेट्रोल आणि डिझेलसाठी स्वतंत्र टाक्या असतात.


या इंधन टाक्या घरातील सामान्य टाक्यांप्रमाणे बनवल्या जात नाहीत, तर त्या विशेष तंत्रज्ञानाने तयार केल्या जातात. या टाक्या स्टीलच्या फॅब्रिकेटेड टाक्या आहेत आणि त्यामध्ये इंधन साठवले जाते. हे घरगुती टाक्यांपेक्षा बरेच वेगळे आहेत.


त्या किती मोठ्या असतात?


या इंधन टाक्या खूपच मोठ्या असतात, परंतु प्रत्येक पेट्रोल पंपानुसार त्यांची क्षमता बदलते. प्रत्येक पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या आकाराच्या टाक्या बनविल्या जातात आणि या टाक्या बनवण्यासाठी आगाऊ परवानगी घ्यावी लागते आणि त्यांच्या क्षमतेच्या आधारेच त्यामध्ये पेट्रोल किंवा इंधन भरले जाते.