मुंबई : आपल्याला हे माहित आहे की, प्रत्येक वस्तुची एक एक्सपायरी डेट असते. त्यामुळे आपण बऱ्याच खाण्याच्या गोष्टी या त्याची एक्सपायरी डेट बघुन विकत घेतो. परंतु तुम्ही कधी पाण्याची बाटली एक्सपायरी डेट पाहुन घेतली आहे का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, पाण्याला खरंच एक्सपायरी डेट असते का? बरं तुम्ही पाण्याच्या बाटलीला नीट पाहिलं आहे का? त्यावर एक्सपायरी डेट असलेली असते. आता जर आपण विचार केला की, पाण्याला एक्सपायकरी डेट नसते. मग या बाटलीवर ती का लिहिलेली असते? चला जाणून घेऊ या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन (FDA) ने देखील पाण्याच्या बाटल्यांवर एक्सपायरी डेट लिहिणे बंधनकारक केलेले नाही. असे का करण्यात आले याचे कारणही तज्ज्ञांनी दिले आहे. त्याबद्दल जाणून घ्या…


लाइव्ह सायन्सच्या रिपोर्टनुसार, पाणी कधीच खराब होत नाही, परंतु जी एक्सपायरी डेट असते ती प्लास्टिकला जोडलेली असते. पाणी साठवण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केला जातो.


विशेष म्हणजे ठराविक वेळेनंतर प्लास्टिक पाण्यात विरघळू लागते. अनेक वर्षे प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी ठेवल्याने पाण्याच्या चवीवर परिणाम होतो. त्याला वास येऊ शकतो.


साधारणपणे, बाटल्यांवर उत्पादनाच्या तारखेपासून 2 वर्षांची कालबाह्यता तारीख लिहिली जाते. या तारखेच्या आत वापरणे चांगले मानले जाते.


आता प्लॅस्टिकचे मानवाला काय तोटे आहेत, ते समजून घेऊ. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सायन्सेसच्या मते, अनेक प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये बीपीए नावाचे रसायन असते. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.


मेयो क्लिनिकच्या मते, बीपीएमुळे रक्तदाब, टाइप-2 मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. बहुतेक बाजारपेठांमध्ये, पाणी साठवण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर एकदाच केला जातो.


या बाटल्या कमी खर्चात तयार केल्या जातात आणि त्या रिसायकल करणेही सोपे असते. पण अनेकदा लोक या बाटल्यांचा वापर बराच काळ करतात. परिणामी, प्लास्टिक विरघळू लागते, ज्यामुळे आरोग्याला हानी पोहोचते.


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर घरांमध्ये जास्त केला जातो. परंतु बीपीए फ्री असलेल्या किंवा स्टीलच्या बाटल्या वापरणे चांगले. घराचा थंड भाग पाणी साठवण्यासाठी वापरा.