Viral Video : तुम्ही रिंगच्या आतमध्ये पहेलवान लढताना पाहिले असतील. तुम्ही डब्लूडब्लूई (WWE) इंटरनॅशनल रेसलिंगही पाहात असाल. पण, तुम्ही कधी रेड्यांची झुंज पाहिलीय का? खुल्या मैदानात दोन रेडे एकमेकांना भिडल्याचा व्हीडिओ व्हायरल झालाय. यात कुणाची जीत झालीय. चला पाहुयात. (fact check 2 bull fighting video viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुल्या मैदानात सुरू आहे झुंजीचा थरार. दोन्ही रेडे ताकदवान. एका रेड्यानं नाव घातक आणि दुसऱ्याचं नाव पृथ्वी. दोन्ही रेड्यांचा आवेश पाहून कोण जिंकणार कोण हरणार हे सांगणं तसं कठीणच. पण, रेडे एकमेकांना हरवण्यासाठी झुंजतायत. मागे ढोल ताशांचा आवाज येत असल्याने झुंज पाहणाऱ्यांमध्येही उत्साह संचारलाय. रेड्यांना चिथवलं जातंय. रेडेही एकमेकांना भिडलेयत. नुसता धुरळाच. 



अखेर या झुंजीत पृथ्वीला हार पत्करावी लागली. हा व्हीडिओ मध्य प्रदेशच्या खरगोनमधील आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रेड्यांच्या झुंजी लावल्या जातात. यात जो रेडा जिंकतो त्याच्या मालकाला घसघशीत बक्षीस दिलं जातं. रेड्यांच्या झुंजी पाहण्यासाठी लोक दूरवरून येत असतात. यावेळी दोन्ही रेडे बराचवेळ झुंजत असल्याने बघ्यांनी झुंजीचा चांगलाच आनंद लुटला.