Fact Check : 21 वर्षीय तरुणाचं 52 वर्षीय आजीसोबत लग्न, Video मागील सत्य जाणून घ्या
Viral Video : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून 52 वर्षीय आजीची प्रेम कहाणीची चर्चा सुरु आहे. या आजीने 21 वर्षीय तरुणाशी लग्न केलं. पण हे लग्न पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Fake Weddings : युद्ध आणि प्रेमात (Love) सगळं माफ असतं, असं म्हणतात. पण सोशल मीडियावर (Social media) प्रसिद्धसाठी काही पण असं आजकाल म्हणायला हवं. गेल्या काही दिवसांपासून 52 वर्षीय आजीची प्रेम कहाणी (love story) चर्चेत आहे. 52 वर्षीय आजीने 22 वर्षीय तरुणासोबत लग्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) झाला. यानंतर या व्हिडिओमागील सत्य पडतळण्यात आलं. या Fact Check दरम्यान एक धक्कादायक सत्य समोर आलं.
हा तर बनावट विवाह!
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram Video) टेक परेशने (techparesh) शेअर केला. यामध्ये तुम्ही पाहू शकता ती महिला म्हणतेय की, लग्न (marriage video) झाल्यानंतर आम्ही दोघेही सुखी आहोत. माझ्या त्याच्यावर खूप जास्त विश्वास आहे. तर तो तरुण म्हणतो आहे की, प्रेमाला वय नसतं, ''जर एखादी व्यक्ती चांगली असेल तर सर्वकाही चागलं असतं.'' (Fact Check 52 old woman marriage 21 young boy Fake Wedding video)
बस्स मग काय हा ही अनोखी प्रेमकहाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. पण धक्का तेव्हा बसला जेव्हा याच इन्स्टाग्राम अकाऊंटवर अजून एक व्हिडिओ दिसला. ज्यात ती महिला दिसतंय मात्र यावेळी तरुण वेगळा आहे. तेव्हा लोकांना संशय आला आणि त्या महिलेची पोलखोल झाली. नेटकऱ्यांना सगळी भानगड कळली.
ही महिला सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी वारंवार बनावट लग्न लावतं होती. फॅक्ट चेकिंग (Fact checking) वेबसाइटने या लग्नाचा आणि व्हिडिओचा खुलासा केला आहे. या सोशल मीडियाच्या जगात प्रसिद्ध होण्यासाठी लोक कुठल्याही थराला जातं आहेत.