India china viral video Fact check : (India China conflict) भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे झटापट झाल्याचं वृत्त समोर आलं आणि अनेकांनाच पुन्हा गलवान आठवलं. चीनच्या सैन्याचा (PLA) सुरु असणाऱ्या कुरापती पाहता परिस्थिती नेमकी किती गंभीर आहे, हेसुद्धा लगेचच स्पष्ट झालं. काही वृत्तांनुसार चीनच्या 300 हून अधिक सैनिकांनी भारतीय हद्द ओलांडली होती. दरम्यान अद्यापही याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. तिथे मंत्रीमहोदय संसदेत सदर घटनेवर निवेदनं देत असतानाच इथे चीन आणि भारताशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(Viral Video) व्हायरल होणाऱ्या या काही मिनिटांच्या व्हिडीओमध्ये एक असं ठिकाण / गाव दाखवण्यात येत आहे, जिथं जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन धोकादायक प्रवास तिथं राहणाऱ्यांना करावा लागत आहे. अतिशय तकलादू शिडीवरून त्यांना कडेपारीतून प्रवास करत अपेक्षित ठिकाणी पोहोचावं लागत आहे. आजुबाजूला शब्दांतही मांडता येणार नाही असं निसर्ग सौंदर्य असूनही या प्रवासात कोणाचाही जीव जाऊ शकतो ही बाब दुर्लक्षित ठेवून चालणार नाही. असं म्हटलं जात आहे ती सोयीसुविधांचा अभाव असणारं हे गाव अरुणाचल प्रदेशातील आहे. 


हेसुद्धा वाचा : India China Conflict : चीनच्या घुसखोरीबाबत राजनाथ सिंह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले सीमाभागात... 


एकंदर वस्ती, नागरिक आणि निसर्ग पाहता हे अरुणाचल प्रदेशच आहे का, असाच प्रश्न तुम्हालाही पडेल. पण, तसं नाहीये. त्यामुळं तुम्हीही हा व्हिडीओ आपल्या देशातील आहे आणि तिथं कशा पद्धतीनं सुविधांचा अभाव आहे असं म्हणत फॉरवर्ड करणार असाल तर आताच थांबा. कारण, हा व्हिडीओ आहे China मधील एका गावाचा. 


अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ चीनच्या दक्षिण प्रांतातील आहे. साधारण अडीच वर्षांपूर्वीच तो व्हायरल झाला होता. हा मूळ व्हिडीओ 2020 मध्ये शेअर करण्यात आला होता. Dangerous mountain village in china असं या व्हिडीओचं शीर्षक होतं. युट्यूबवरही हा व्हिडीओ चीनचाच असल्याचं सांगण्यात आलं आहे. 




कुठे आहे हे गाव? 


CNN च्या वृत्तानुसार दक्षिण-पश्चिम चीनमध्ये साधारण 800 फूट उंच डोंगरमाध्यावर राहणाऱ्या या खेडेगावातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. सिचुआन प्रांतात असणाऱ्या 200 वर्षांपूर्वीपासूनच वसलेल्या या गावाचं नाव आहे, atuler असं आहे. हे गाव त्यावेळी चर्चेत आलं होतं जेव्हा शालेय विद्यार्थी तिथं जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करताना दिसले होते. 


साधारण दोन तासांच्या प्रवासानंतर गावातील नागरिक शहरी जीवनाच्या संपर्कात येत. प्रवासासाठी, बाजारहाट करण्यासाठी, शहराकडे जाण्यासाठी याच शिडीवरून येथील गावकरी प्रवास करतात. दरम्यान, स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार हल्लीच या गावातील 84 नागरिकांनी त्यांच्या या गावाचा निरोप घेत 75 किमी दूर असणाऱ्या झाओजु काउंटी येथे नव्यानं आयुष्य सुरु केलं. अजूनही या गावात जवळपास 30 कुटुंब वास्तव्यास आहेत असं सांगण्यात येतं.