नवी दिल्ली : सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट, बातमी किंवा फेक न्यूजही अगदी काही वेळातच करोडो लोकांपर्यंत पोहचते. अशाच प्रकारची एक फेक न्यूज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात असा दावा करण्यात आला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)  यांना पत्र लिहून, भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी त्यांच्या योगदानाबाबत शुभेच्छा दिल्या आणि अयोध्येत श्री राम मंदिराच्या (Ram Mandir) लवकरात लवकर बांधकामासाठी 50 कोटी रुपये पाठवण्याची बाब सांगितली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फेक पत्रामध्ये 7 ऑगस्ट ही तारिख लिहिण्यात आली आहे. त्यावर पंतप्रधान मोदींची खोटी स्वाक्षरीही आहे. या कथित पत्राची दखल घेत पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्टीकरण जारी केलं आहे. स्पष्टीकरणात त्यांनी हे पत्र 'फेक' असल्याचं घोषित केलं आहे. पीआयबीने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, पंतप्रधान कार्यालयाने, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना असं कोणतंही पत्र लिहिलेलं नाही.


पीआयबी फॅक्ट चेकने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, एका फेसबुक यूजरने एक पत्र पोस्ट केलं आहे, ज्यात, हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलं असल्याचा दावा करण्यात आला असून हे पत्र फेक आहे, असं सांगितलं आहे.