Fact Check: तुम्हीही एसबीआय (SBI) खातेदारकांपैकी एक असाल, तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची. कारण, सध्या देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या (SBI) एसबीयाच्या व्यवहारासंबंधीची एक महत्त्वाची माहिती असणारा मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅसेजमध्ये दावा करण्यात येत आहे की Saving Account मध्ये तुम्ही प्रतीवर्षी फक्त 40 ट्रांजॅक्शन करु शकता. याहून जास्त ट्रांजॅक्शनसाठी खात्यात असणाऱ्या रकमेतून 57.5 रुपये कापण्यात येतील असं सांगण्यात येत होतं. 


पीआयबीनं सांगितलं नेमकं सत्य 
वरील मेसेजशिवाय आणखी एक मेसेजही व्हायरल होत आहे. जिथं एटीएममधून 4 हून अधिक वेळा पैसे काढल्यास 173 रुपये कापण्यात येतील असं त्यात नमूद करण्यात आलं होतं. पण, PIB नं स्पष्ट केल्यानुसार बँकेनं असा कोणताही नियम केलेला नाही. 


सदर मेसेज आणि चर्चा निव्वळ अफवा असल्याचं सांगत एसबीआयकडून कोणताही नियम बदलण्यात आल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. 


बँक खातेधारकांसाठी गुडन्यूज, एका दिवासात या 4 बँकांनी FDवर वाढवले व्याज


काय आहे, पीआयबी फॅक्ट चेक? 


सोशल मीडियाची चलती असणाऱ्या या काळात बरीच चुकीची माहिती व्हायरल होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशातच तुम्हालाही एखादं सोशल मीडिया अकाऊंट किंवा एखाद्या मेसेजबाबत संशय असेल तर तुम्ही PIB च्या माध्यमातून फॅक्ट चेक करु शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/  या संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. शिवाय 8799711259 किंवा या pibfactcheck@gmail.com ईमेल आयडीवर माहिती पाठवू शकता.