Viral Video : बातमी आहे एका व्हायरल व्हिडिओची. पुलावरून पाणी जात असताना कार नेण्याचं धाडस ड्रायव्हरनं केलं. पण, त्याचं हे धाडस गाडीतील प्रवाशांच्या जीवावर बेतलंय, असं काय घडलं? चला पाहुयात. (fact check viral polkhol car drown river video viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलावरून पाणी जात होतं. लोक पूर पाहण्यासाठी नदी किना-यावर आले होते. त्यावेळी इथं भलतंच पाहायला मिळालं. पुलावरून पाणी जात असताना एक गाडी वेगानं आली आणि थेट पुलावरून पाणी जात असताना पुढे निघून गेली. आता पुन्हा एकदा पाहा.पुलावरून पाणी जातंय. पाण्यात गाडी फसली तर जीवाशी खेळ होऊ शकतो हे माहित असतानाही नसतं धाडस या ड्रायव्हरनं केलं आणि वेगानं गाडी घेऊन हा निघून गेला. 


पण, पाण्याच्या प्रवाहासमोर याच्या गाडीचा टिकाव काही लागला नाही.  कारण जसजशी ही गाडी पुढे जात होती तसं तसं तिच्यावरचं संकट वाढत जात होतं. पण मागे जाण्याचाही मार्ग बंद झाला होता आणि एका जागेवर थांबवणं म्हणजे जीव धोक्यात घालणंच होतं. 


त्यामुळे पुढे जाणं हाच यांच्यासमोर पर्याय होता. त्यामुळे गाडी पुढे नेली. अखेर या गाडीचा पाण्यासमोर काही टिकाव लागला नाही आणि गाडी नदीत कोसळली. बघा ही गाडी कशी अलगद पुलावरून खाली उलटली. पाहणारे लोक आरडाओरड करत होते. पण, पाण्याच्या रौद्रारुपासमोर कुणाचीही त्यांना वाचवायची हिंमत झाली नाही. अखेर ही गाडी पाण्यात बुडालीच. हा व्हिडिओ कुठलाय हे कळू शकलं नाहीये.


नागपुरातील घटना ताजी असताना आता हा व्हिडिओ समोर आलाय. तरीदेखील कुणीही त्यातून बोध घेतला नाहीये. अतिधाडस आणि अतिउत्साह हा अनेकदा जीवावर बेतू शकतो. त्यामुळे पुलावरून पाणी जात असेल तर असं धाडस करू नका.