Fast Tag, Fact Check : फास्टॅग स्कॅन करून कुणीही पैसे काढू शकतं?
तुमच्या कारवर लावलेल्या फास्टॅगवरून कुणीही सहज पैसे काढू शकतं, असा दावा करण्यात येत आहे.
Viral Messege : तुमच्याकडे कार (Car) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाचीय कारण. तुमच्या कारवर लावलेला फास्टॅग (Fast Tag) सुरक्षित नसल्याचा दावा करण्यात आलाय. त्या फास्टॅगवरून कुणीही तुमचं खातं खाली करू शकतं असा दावा करण्यात आल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली. खरंच या दाव्यात तथ्य आहे का? याची पडताळणी (Fact Check) केली त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol car fast tag cash deducted know what true what false)
तुमच्या कारवर लावलेल्या फास्टॅगवरून कुणीही सहज पैसे काढू शकतं, असा दावा करण्यात येत आहे. स्मार्टफोनने फास्टॅग स्कैन करून पैसे काढता येतात असा दावा करण्यात आलाय. तसा एक व्हिडिओही व्हायरल होतोय. या व्हिडिओत पाहा. एक मुलगा कारची काच साफ स्वच्छ करतोय. त्याच्या हातात स्मार्टवॉच दिसतंय. काच साफ करता करता तो हे स्मार्टवॉच फास्टॅगवर टेकवतो. त्यानंतर आपल्या कामाचे पैसे न घेताच तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. कारचालक त्याला हाक मारून मागे बोलावतो.
यावेळी या मुलाच्या चेहऱ्यावर भीती दिसतेय. त्यानंतर कारचालक त्याला त्याच्या हातातील स्मार्टवॉचबद्दल विचारतो. तेव्हा हा मुलगा पळून जातो. कारचालकाने हा स्कॅम असल्याच म्हटलय. पण, अस स्मार्टवॉचने फास्टॅग स्कॅन करून पैशाची चोरी करता येते का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. याबाबत एक्सपर्टकडून माहिती घेतली. त्यावेळी त्यानी काय माहिती दिली पाहा.
व्हायरल पोलखोल
फास्टॅग स्कॅन करून स्मार्टवॉचने पैसे काढणं शक्य नाही. फास्टॅगवरून कुणीही पैसे काढू शकत नाही. फास्टॅग हे सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा आहे. लोकाची दिशाभूल करण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातात त्यामुळे याची सत्यता पडताळल्याशिवाय असे मेसेज फॉरवर्ड करू नका. आमच्या पडताळणीत फास्टॅग स्कॅन करून स्मार्टवॉचने पैसे काढता येतात हा दावा असत्य ठरला.