Fact Check : वीज कोसळण्यापूर्वीच कळणार?
वीज कोसळण्यापूर्वी 15 मिनिटं आधी मोबाईलवर माहिती मिळणार आहे. असं एक अॅप विकसित करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय.
मुंबई : वीज कोसळण्यापूर्वी 15 मिनिटं आधी मोबाईलवर माहिती मिळणार आहे. असं एक अॅप विकसित करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं पाहा. (fact check viral polkhol lightining alert damini app)
दावा आहे की वीज कोसळण्यापूर्वी आता एक अॅप वीजेची पूर्वसूचना देणाराय..वीज कुठे पडणार आहे, याची माहिती तुमच्या मोबाईलमध्ये 15 मिनिटं आधीच कळणाराय.असा एक मेसेज व्हायरल होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय...खरंच या दाव्यात तथ्य आहे का? महाराष्ट्रासह देशभरात वीज पडून वर्षाला 2500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे असं अॅप आलं असेल तर एवढ्या लोकांचा जीव नक्कीच वाचू शकतो.
त्यामुळे असं खरंच अॅप आहे का? अॅपमुळे वीज पडण्यापूर्वी इत्यंभूत माहिती मिळते का? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्यावेळी असं एक अॅप असल्याचं समोर आलं.नक्की काय आहे हे अॅप पाहुयात.
काय पोलखोल झाली?
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने दामिनी अॅप तयार केलंय. गुगल प्ले स्टोअरवर दामिनी अॅप उपलब्ध. अॅपमध्ये जीपीएसद्वारे वीज पडण्यापूर्वी माहिती मिळते. वीजेबाबतची स्थिती 15 मिनिटांपूर्वी कळते.
माहिती मिळताच सुरक्षास्थळी पोहोचावं असं आवाहन करण्यात आलंय. या अॅपच्या माध्यमातून वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचे त्यांच्या परिसरातील अचूक अंदाज पंधरा मिनिटे ते अर्धा तास आधी घरबसल्या मिळणार आहेत. त्यामुळे आमच्या पडताळणीत वीज पडण्याची पूर्वसूचना मिळणारं अॅप असल्याचा दावा सत्य ठरला.