Loan On Aadhar Card : तुमच्याकडे आधारकार्ड (Aadhar Card) असेल तर तुम्हाला कर्ज (Loan) मिळू शकतं.हे आम्ही म्हणत नाहीये तर अशा आशयाचा एक मेसेज व्हायरल (Viral Messege) होतोय. यामध्ये तसा दावा करण्यात आलाय.पण, खरंच आधारकार्डने कर्ज मिळवता येतं का? याची आम्ही पडताळणी (Fact Check) केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol loan on aadhar card know what true what false)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दावा आहे की तुमच्या आधार कार्डवर कर्ज मिळू शकतं. तेही पावणे पाच लाखांपर्यंत. हा मेसेज व्हायरल होत असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. याची सत्यता जाणून घेण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही याची पोलखोल केली. पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय तेदेखील पाहुयात.


व्हायरल मेसेज


सर्व आधार कार्डधारकांना सरकार 4 लाख 78 हजार रुपयांचे कर्ज देणार आहे. ज्या लोकांना हे पैसे हवे आहे, त्यांना रजिस्ट्रेशन करावे लागेल. ही स्कीम अत्यंत कमी दिवसांसाठी असल्याने ज्यांना कर्जाऊ रक्कम हवी आहे, त्यांनी त्वरित अर्ज करावा. हा दावा केल्यानं आम्ही याबाबत पडताळणी केली. त्यावेळी या मेसेजबद्दल इत्यंभूत माहिती मिळाली. त्यावेळी काय पोलखोल झाली पाहुयात.


व्हायरल पोलखोल


आधार कार्डधारकांना सरकारतर्फे कर्ज मिळतं हा दावा खोटा आहे. आधार कार्डवर अशी कोणतीही स्कीम सुरू नाही. बनावट मेसेजच्या प्रलोभनांना बळी पडू नका. कर्जाच्या लालसेने खासगी माहिती कुणाला देऊ नका. आधार कार्डवर कर्ज मिळतं हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला. त्यामुळे अशा भूलथापांना बळी पडू नका.