मुंबई : बातमी आहे एका व्हायरल व्हीडिओची. एक व्यक्ती शेकडो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करत असताना अचानक हवेत गरूड आलं आणि या गरूडानं जे केलं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. गरुडानं काय केलं चला पाहुयात? (fact check viral polkhol paragliding with black vulture)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेकडो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करत असतानाच अचानक एन्ट्री झाली ती या गरूडाची. शेकडो फूट उंचीवर अचानक गरूड झेपावल्यानं पॅराग्लायडिंग करणाऱ्याचा थरकाप उडाला. गरूड याच्या वाटेत आडवं येत असल्यानं याला खालीही उतरता येईना आणि वरतीही जायला जमेना. 


शेकडो फूट उंचीवर हा थरार सुरू होता. अखेर हे गरुड हळूहळू जवळ येतं आणि या व्यक्तीच्या शूजवर बसतं. मग सुरू झाला पॅराग्लायडिंग करताना गरुडासोबतचा प्रवास. हा व्हीडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय. पण, या गरुडानं हल्ला केला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, सुदैवानं तसं काही झालं नाही. 


निवांतपणे हे गरूड याच्या पायावर बसून पॅराग्लायडिंगची मज्जा घेत होतं. पण, हा व्हिडिओ कुठला आहे याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय पोलखोल झाली पाहुयात. 


व्हायरल पोलखोल


ब्राझीलमधील पॅराग्लायडिंगचा हा व्हिडिओ आहे.  ही व्यक्ती पॅराग्लायडिंग करताना गरूड अचानक आलं. काही वेळाने गरुड ग्लायडरवर बसून विहार करू लागलं. 


यामुळेच सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा सुरूये. हा व्हिडिओ पाहून काही नेटिजन्स म्हणू लागले की गरुडानं या व्यक्तीकडून लिफ्ट घेतली. होय, असंच कदाचित असावं.