Fact Check : सत्यनारायण कथा इंग्लिशमध्ये ऐकलीय का?
तुम्ही सत्यनारायणाची कथा (Satyanarayan Puja) मराठीत ऐकली असेल. पण, कधी इंग्लिशमध्ये सत्यनारायणाची कथा ऐकलीय का?
मुंबई : तुम्ही सत्यनारायणाची कथा (Satyanarayan Katha) मराठीत ऐकली असेल. पण, कधी इंग्लिशमध्ये सत्यनारायणाची कथा ऐकलीय का? सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल (Viral Video) झालाय. या व्हीडिओत पंडित चक्क इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये कथा सांगतायत. एका घरामध्ये सत्यनारायणाची पूजा सुरूये. तिथे हे पंडित इंग्लिशमध्ये कथा सांगतायत. (fact check viral video satyanarayan katha in english know what false what true)
यावेळी बाजूला बसलेले सगळेजण कथा ऐकण्यात मग्न आहेत. आपण सत्यनारायणाची पूजा संस्कृतमध्ये ऐकली असेल. इतकंच काय तर हिंदीतही ऐकली असेल. पण, आता थेट इंग्लिशमध्येही सत्यनारायण कथा सांगितली जातेय.
दक्षिण भारतात काही भागात इंग्लिश भाषाच बोलली जाते. पूजा ऐकणाऱ्यांना ही कथा कळावी यासाठी इंग्लिश भाषेतच पंडित कथा ऐकवतायत. भगवान सत्यनारायणाची कथा पंडित सांगताना हा व्हीडिओ मोबाईलमध्ये बनवण्यात आला. आता हा व्हिडिओ व्हायरल होत असून, सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.