Fake Currency Note : देशात बोगस नोटांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) याबाबत सावधगिरीचा इशारा दिलाय. RBIच्या ताज्या आकडेवारीनुसार 2020-21 या वर्षात 500च्या बोगस नोटांमध्ये तब्बल 102 टक्के वाढ झालीये. तर 2000च्या नकली नोटांचं प्रमाण 54 टक्के वाढलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

200 रुपयांच्या नोटांत 11.7 टक्के, 20 रुपयांच्या नोटांमध्ये 16.5 टक्के तर  10 रुपयांच्या नकली नोटांमध्ये 16.4 टक्के वाढ झालीये. 2016मध्ये सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर बोगस नोटांचं प्रमाण कमी होईल, असं मानलं जात होतं. मात्र आता पुन्हा एकदा खोट्या नोटा छापून चलनात आणणारं मोठं रॅकेट कार्यरत झाल्याचं स्पष्ट झालंय. 


बनावट नोटा कशा ओळखायच्या
- नोट उजेडासमोर धरल्यावर या भागात 500 लिहिलेलं दिसेल. 
- डोळ्यांसमोर 45 अंशांच्या कोनात नोट धरल्यावर या जागी 500 आकडा दिसेल. 
- इथं देवनागरीमध्ये 500 असं लिहिलेलं असेल. 
- गांधीजींचं छायाचित्र एकदम मध्यभागी असेल. 
- भारत आणि इंडिया असे शब्द लिहिलेले दिसतील. 
- नोट थोडी दुमडल्यास सिक्युरिटी कोड थ्रेडचा रंग हिरव्याचा निळा झालेला दिसेल. 
- या ठिकाणी महात्मा गांधींचा फोटो आणि इलेक्ट्रोटाईप वॉटरमार्क दिसेल. 
- अशोकस्तंभ आणि महात्मा गांधींचं रफली प्रिंट केलेलं छायाचित्र असेल. 
- स्वच्छ भारतचं स्लोगन आणि लोगो प्रिंट असेल. 


त्यामुळे तुम्ही सावध राहा. 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारताना काळजी घ्या.