सूरत : डोक्यावर कर्जाचे ओझे असलेल्यांना बऱ्याचदा मानसिक त्रासातून जावे लागते. पण गुजरातमध्ये अशा कर्जदारांचे कर्ज फेडून देण्यासाठी शक्कल शोधली जात होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बनावट नोटा छापून कर्जदारांना पैसे देण्याचा सपाटा सुरु केला. पोलिसांनी याप्रकरणी ४ जणांना अटक केली आहे.


सूरतमधील डिंडोली गावात हा प्रकार उघडकीस आला. या टोळक्याने बनावट नोटांचा कारखानाच सुरू केला होता. या बनावट नोटांचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी करत होते.  ७० ते ८० लाखांच कर्ज फेडण्यासाठी हे भामटे १००, ५००, आणि २ हजार रुपयांच्या बनावट नोटा छापत होते.


हे टोळके मोठ्या कर्जदारांना बनावट नोटा छापून देत ज्याचा वापर कर्जदार कर्ज फेडण्यासाठी करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गुजरात पोलिसांनी मोठी कारवाई आहे.


 काही दिवसांपूर्वी सूरतमधील डिंडोली परिसरात एक टोळके बनावट नोटा छापत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या छापखान्यावर धाड घातली. पोलिसांनी  जाळे रचून शिताफिने यांना अटक केली आहे. 


  ४० लाखाच्या नोटा जप्त


४० लाख ७३ हजार रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. या नोटा १००,५००, २ हजार रुपयाच्या नोटांच्या स्वरुपात होत्या. सूरतमध्ये बनावट नोटा छापणारे टोळे सक्रिय असल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून पोलीस या टोळक्याच्या शोधात होते.