Crime News Today in Marathi: तुम्हाला कधी सोशल मीडियात फेक अकाऊंटवरुन रिक्वेस्ट आली आहे का? तुम्ही ती रिक्वेस्ट स्वीकारल्यावर समोरची व्यक्ती तुमच्याशी संवाद साधायला सुरुवात करते. त्यानंतर तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेलिंक करते. आणि तुमचे बॅंक अकाऊंट खाली करुन पसार होते. आजकाल बहुतांश तरुण-तरुणी इन्स्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडिया अकाऊंटवर असतात. अशावेळी फेक अकाऊंट बनवून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारे स्कॅमर्सही अॅक्टीव्ह असतात. एका टोळीने पाच हजार लोकांची 25 कोटी रुपयांची फसवणूक  केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या दिवसाचा बराचसा वेळ सोशल मीडियात जातो. दुसऱ्या बाजुला आपल्याशी कोण बोलतोय याची आपल्याला माहिती नसते. याचा फेक अकाऊंट बनवून ब्लॅकमेलिंक करणाचा प्रकार सुरु होता. याप्रकरणी 5 जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. हे लोक मुलीच्या नावाच्या आयडीद्वारे लोकांना स्वतःशी जोडायचे. त्यानंतर अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करायचे. ते एवढ्यावरच थांबायचे नाहीत तर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीदेखील द्यायचे.


खुलेआमपणे त्यांचा हा व्यवसाय सुरु होता. गुन्हेगारांच्या बॅंक खाती भरु लागली होती. ते आपल्या खात्यात हव्या त्या रकमा ट्रान्सफर करून घेत होते. अखेर पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आला आणि गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या. अटक करण्यात आलेल्या सायबर ठगांमध्ये तीन राजस्थानचे आणि दोन यूपीचे आहेत.


मुरादाबादच्या एका व्यावसायिकाला फेसबुकवर रिया शर्माच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली.व्यावसायिकाने रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्याच्याकडून व्हॉट्सअॅप नंबर घेतला गेला. यानंतरअश्लील चॅटिंगही सुरु झाले.  दोघांच्यात बोलणे सुरु झाले. खोट्या अकाऊंटवरील रियाने मैत्री आणखी जवळ नेली. मुलीच्या नावाने चॅटिंग करत समोरचा गुन्हेगार व्यावसायिकाचा विश्वास संपादन करत होता. पण व्यावसायिकाच्या ही गोष्ट लक्षात येत नव्हती. एक दिवस अचानक व्यावसायीकाला व्हिडीओ कॉल आला. त्याने हा व्हिडीओ कॉल उचलला आणि येथेच त्याचा पाय आणखी खोलात गेला. त्याचा अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ कधी बनला हे त्याच्या लक्षात आले नाही.


यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी व्यावसायिकाला देण्यात आली. गुंडांनी व्यावसायिकाकडून 9.50 लाख रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले होते.प्रकरण डोक्याबाहेर गेल्याने व्यावसायिकाने पोलिसांत धाव घेतली.


फेक अकाऊंटवरुन लुटणाऱ्यांविरोधात मुरादाबाद सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसपी क्राइम सुभाषचंद्र गंगवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुंडांचा शोध सुरू केला. संबंधित फोन नंबर ट्रेस करताना पोलिसांनी पाच जणांना अटक केल्याची माहिती एसएसपींनी दिली. या गुंडांनी यूपी, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश आणि इतर राज्यातील पाच हजारांहून अधिक लोकांना फसवल्याची कबुली दिली. या टोळीत 40 हून अधिक जण सक्रीय असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.


अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजस्थानच्या दींग भरतपूर जिल्ह्यातील सिकरी पोलीस स्टेशन हद्दीतील बेला गावचा रहिवासी लुकमान, अशफाक आणि अलवर जिल्ह्यातील चौपंकी येथील रहिवासी आफ्रिद, मथुरा जिल्ह्यातील कोसी पोलीस स्टेशन हद्दीतील नांगला सिरौली येथील रहिवासी नसीर यांचा समावेश आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तसेच सोशल मीडियातील ओळखीवर विश्वास ठेवू फसवणुकीला बळी पडू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.