Rakesh Jhunjhunwala यांच्या फेवरेट शेअर्समध्ये घसरण; पुन्हा गुंतवणूकीची संधी
मार्केटच्या तेजीमध्येही मंदीत सापडलेल्या या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना पैसा गुंतवण्याची चांगली संधी आहे.
मुंबई : Rakesh Jhunjhunwala हे शेअर मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदार आहेत. त्यांच्या काही शेअर्सची चाल मार्केटच्या तेजीत देखील सुस्त राहिली आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामिल असलेल्या काही शेअर्सने गेल्या 6 महिन्यात निगेटिव्ह रिटर्न दिला आहे. मार्केटच्या तेजीमध्येही मंदीत सापडलेल्या या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना पैसा गुंतवण्याची चांगली संधी आहे. या शेअरच्या मजबूत फंडामेंटल्समुळे ब्रोकरेज हाऊसेसने यामध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. आतापर्यंत तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे शेअर्स नसतील तर यामध्ये गुंतवणूक करण्याची ही चांगली संधी आहे.
Lupin Limited
या शेअरमध्ये गेल्या 6 महिन्यात साधारण 2 टक्के घसरण झाली आहे. शेअर सध्या 982 रुपयांवर ट्रेड करीत आहे. ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलने या शेअरसाठी 1300 रुपयांचे तर शेअर खानने या शेअरसाठी 1400 रुपयांचे टार्गेट दिले आहे.
Tata Motors
टाटा मोटर्सचा शेअर 6 महिन्यात 5 टक्क्यांनी घसरला आहे. हा शेअर आता 295 रुपयांवर ट्रेड करीत आहे. ब्रोकरेज हाऊस जेफरिजने यामध्ये 435 रुपयांचे तर एमके ग्लोबलने या शेअरसाठी 400 रुपयांचे टार्गेट दिले आहे.
NCC
या शेअरने 6 महिन्यात 10 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली आहे. हा शेअर सध्या 76 रुपयांवर ट्रेड करीत आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI Directने या शेअरसाठी 100 रुपयांचे टार्गेट दिले आहे.
Federal Bank
या शेअने 6 महिन्यात 3 टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. सध्या शेअर 83 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. ब्रोकरेज हाऊस एंजेल ब्रोकिंगने शेअरसाठी 110 रुपयांचे टार्गेट दिले आहे.
Coal India
या शेअरमध्ये 6 महिन्यात 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. सध्या शेअर 148 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालने या शेअरसाठी 185 रुपयांचे लक्ष दिले आहे.